Radhakrishana Vikhe Patil News : राज्यात खातेवाटपावरून घमासान; महसुलमंत्री विखे जनता दरबारात सलग आठ तास बसून...

Ahmednagar Politics : महिन्यातून एकदा जनता दरबाराचे आयोजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून केले जाते.
Radhakrishana Vikhe Patil News
Radhakrishana Vikhe Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : प्रशासनातील अधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न जनता दरबारातून होत असतो. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. रविवारी(दि.९) तब्बल ८ तास चाललेल्या दरबारातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत मंत्री विखे पाटील यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली.

राज्यातील काही मोजके राजकारणी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करतात. बारामतीत अजित पवार(Ajit Pawar) यांचाही जनता दरबार प्रसिद्ध आहे. जनतेची गाऱ्हाणी ऐकून थेट उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रलंबित प्रश्न सोडवली जात असल्याने सामान्य जनतेला जनता दरबार मोठा आधार वाटतो. विखे पाटील परिवाराने जनता दरबाराची प्रथा अनेक वर्ष जोपासत नागरिकांशी बांधिलकी जोपासली आहे.

Radhakrishana Vikhe Patil News
Ajit Pawar News : अर्थ खाते अजित पवारांकडे? 'या' पत्राची होतेय जोरदार चर्चा

महिन्यातून एकदा जनता दरबाराचे आयोजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishana Vikhe Patil) यांच्याकडून केले जाते. मतदार संघासह जिल्ह्यातील नागरीक आणि कार्यकर्ते आवर्जून या दरबारात येवून आपल्या समस्या विखे पाटील यांच्या कानावर घालतात. शक्य असेल तिथेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात.

सार्वजनिक प्रश्नाच्या संदर्भात योग्य समन्वय साधून नागरिकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंत्री विखे पाटील यांच्या आशा दरबारातून होत असल्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नामध्‍ये योग्य मार्ग निघत असल्याचा अनेकांचा अनुभवच या दरबाराचे फलित असल्याचे नेहमीच बोलले जाते.

Radhakrishana Vikhe Patil News
Dr.Bhagwat karad News : बैठकांवर बैठका, पण पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीनेच..

राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनता दरबारात आपल्‍या कार्यालयात तब्बल आठ तास थांबून रात्री ११ वाजेपर्यत त्यांनी शेवटच्या माणसाचे निवेदन स्विकारत दिलासा दिला. प्रत्येक कागद वाचून त्यांनी काही नागरीकांच्या अर्जावर स्वत:सूचना लिहीत प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

जनता दरबारात भेटणाऱ्या लोकांच्या गर्दीचा उच्चांक झाला.दोन वाजता सुरू झालेल्या दरबारात रात्री अकरा वाजता रांगेतील शेवटच्या माणसाचा अर्ज स्विकारत आणि कार्यवाहीचे आदेश देत संपला.(Latest Marathi News)

Radhakrishana Vikhe Patil News
Ram Shinde Vs Rohit Pawar: 'खर्ड्या'त रोहित पवारांना पुन्हा धक्का; ग्रामपंचायतीत दोन सदस्य फुटल्याने उपसरपंचपद राम शिंदेंच्या गटाकडे

'' नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची कायम भूमिका"

राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले, समस्‍या घेवून येणाऱ्या कोणत्‍याही नागरिकाला न्‍याय देणे ही भूमिका सार्वजनिक जीवनात काम करताना आपण कायम ठेवली. प्रश्‍न व्‍यक्तिगत असो की सार्वजनिक तो मार्गी लागणे महत्‍वाचे असते. यासाठी प्रशासनातील आधिकारी आणि नागरीक यांच्‍यात योग्‍य समन्‍वय साधून प्रश्‍नांच्‍या सोडवणुकीचा प्रयत्‍न आपण नेहमीच करत असतो. या माध्‍यमातून जनतेलाही एक विश्‍वास आणि समाधान मिळते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com