

Solapur, 20 August : पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येत नव्हता.
मात्र, आता सगळीकडे आमची (भाजप) सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता सोलापूर जिल्ह्यात काहीच शिल्लक नाही, असा दावा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर कोल्हापुरातून लोकसभेला निवडून आलेले आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी केला आहे.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीसाठी महाडिक हे सोलापूरमध्ये आले आहेत. त्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना खासदार महाडिक यांनी आपल्याच मित्रपक्षाच्या अस्तित्वाबाबत भाष्य केले आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नसून भाजप आणि मित्रपक्षांसोबत सर्वजण आले आहेत, असे सांगणाऱ्या खासदार महाडिक यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबाबत मात्र बोलणे टाळले.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघसाठी भाजपची नाव नोंदणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे आजच्या भाजपच्या बैठकीत काही लोकांनी पक्षप्रवेश केला, तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, असे महाडिक यांनी सांगून पुणे पदवीधरबाबत दावा पक्का केला आहे.
सोलापूरमधील एसआयआर बैठकीबाबत धनंजय महाडिक म्हणाले, ‘कोणत्याही निवडणुका यादीवर अवलंबून असतात. गेल्या अनेक वर्षे मतदारयादीचं शुद्धीकरण झालं नव्हतं. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR प्रणाली सुरू आहे.
बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, मृत मतदार, स्थलांतरित मतदार अशा गोष्टी सुरू होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात चार लाख 91 हजार जण मतदार यादीतून निघाले. एसआयआरमुळे एक कोटीपर्यंत मतदार सुद्धा होतील आणि त्यामुळे भविष्यातील निवडणुका लढवणे सोयीस्कर होईल.
एसआयआर यादीचं 70 ते 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. एसआयआरमुळे 2029 ला फायदा होईल, पश्चिम बंगालमध्ये चुकीचा आधार घेऊन काही लोक निवडून येत होते. आता तसं होणार नाही आणि जे मतदार आहेत तेच इथे राहतील. भाजप आणि मित्रपक्षांना यांचा मोठा लाभ होईल, असेही महाडिक म्हणाले.
गोपीचंद पडळकरांचाही महाडिकांच्या सुरात सूर...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही धनंजय महाडिक यांच्या सुरात सूर मिसळत ‘पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, आता भाजपची ताकद तुम्ही पाहत आहात. सोलापूर जिल्ह्यातही सर्वत्र भाजपची ताकद वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या. त्या ठिकाणी भाजप एक नंबरवर आहे.. पूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे. पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीस यांचा यांनी यांनी जे विकासात राजकारण केलंय, त्यामुळे विचार तळागाळापर्यंत पोहोचला आहे, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.