Karad Politics : कराड उत्तर मतदारसंघात सत्ता राष्ट्रवादीची अन् भाजपने आणला पाच कोटींचा निधी!

NCP Vs BJP : जाणून घ्या, नेमकं काय कारण आणि कशा घडताय राजकीय घडामोडी?
NCP-BJP
NCP-BJPSarkarnama
Published on
Updated on

Karad News : साताऱ्यातील कराड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना, या ठिकाणी भाजपाकडून तब्बल 5 कोटींचा निधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातून राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचे दिसत आहे.

कराड उत्तर मतदार संघात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. या मतदार संघात आगामी काळात भाजप विरूध्द राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यातच लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच त्यांच्या विरोधात नियोजन आखणं सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कराड उत्तर मतदार संघात भाजपाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध केला जात आहे आणि विकास कामांचे भूमिपूजनही वाजत- गाजत केलं जात आहेत.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कराड उत्तर मतदार संघात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवानेते मनोज घोरपडे, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्याकडून राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नेहमीच हल्लाबोल केला जात आहे. तर आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही विकासकामांबाबत प्रत्युत्तर दिले जात आहे.

या मतदार संघात यापूर्वी धैर्यशील कदम हे काँग्रेस, शिवसेना पक्षात होते आणि सध्या भाजपात सामील होत, त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. दुसरीकडे मनोज घोरपडे हे मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते. तर या मतदार संघात तिसरे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील हे होते.

सध्यस्थितीत आमदार पाटील यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवार एकत्रित आले असून ते दोघेही भाजपात आहेत. तेव्हा आता दोघांपैकी एक उमेदवार हा आगामी विधानसभा निवडणुक रिंगणात असणार असून, मतांचे विभाजनाचा फटका टाळला जाणार आहे. आमदार पाटील यांना मतविभाजनासोबत विकासकामांतूनही आव्हान देण्याचा प्रयत्न कराड उत्तरच्या भाजपाच्या नेत्यांकडून सुरू आहे.  

NCP-BJP
Karmala Sugarcane Issue : शिंदे-सावंतांवर शेतकऱ्यांचा भरोसा नाय का? करमाळ्यातील ऊस पवारांच्या कारखान्यांना...

60 विकासकामांसाठी 5 कोटी -

कराड उत्तरमध्ये भाजपाकडून आमदार पाटील यांच्या विरोधात एकजूट ठेवत आणि राज्यात, केंद्रातील सरकारकडून विकासकामे आणली जात आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या उपस्थित जवळपास 60 विकासकामांचे भूमिपूजन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कराड उत्तरेत विकासकामांची गंगा विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि विरोधातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, युवानेते मनोज घोरपडे, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या माध्यमातून येत असल्याची भावना सामान्य लोकांमधून व्यक्त केली जात आहे. 

विकासकामांसाठी श्रेयवादाची लढाई -

गेल्या काही दिवसांपूर्वी कराड उत्तरेतील निधीवरून राजकीय आरोप- प्रत्यारोप झाले होते. यावेळी कराडच्या दत्त चौकात विकासकामे कोणाची हे सांगण्यासाठी यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून आव्हान देण्यात आले होते. यावर भाजपाकडून मसूरच्या चौकात येण्याचे प्रतिआव्हान देण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासकामे आपणच आणल्याचा दावा केला जात आहे. आताही भाजपाकडून कराड उत्तर मतदार संघातील 60 विकासकामांसाठी 5 कोटीचा निधी आणला असल्याचे सांगितले जात आहे. कराड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपाकडून निधी मोठ्या प्रमाणावर आणला जात असल्याने चांगलीच चर्चा रंगत आहे.

कराड उत्तरची जबाबदारी भाजपाने स्वीकारली -

कराड उत्तरच्या आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद असताना मोठ्या प्रकल्पासह औद्योगिककरण करता आले नाही. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यातच त्यांचा हातखंडा आहे. अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी मसूर (ता. कराड) येथे रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटकरण भूमिपूजन प्रसंगी केली. आता कराड उत्तरच्या विकासाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. विकासासाठी 200 कोटी पर्यंतच्या निधीची तरतूद करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com