Karmala Sugarcane Issue : शिंदे-सावंतांवर शेतकऱ्यांचा भरोसा नाय का? करमाळ्यातील ऊस पवारांच्या कारखान्यांना...

Karmala Sugarcane politics :करमाळा तालुक्याचा विचार केला तर शिंदे आणि सावंत यांच्या तुलनेत पवारांची कारखानदारी सरस ठरल्याचे यावरून दिसून येत आहे.
SugarCane FRP Issue
SugarCane FRP IssueSarkarnama
Published on
Updated on

Karmala News : करमाळा तालुक्यात सुमारे 25 लाख टनांपेक्षा जास्त ऊस असूनही तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस न देता बाहेरील कारखान्यांना देण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वाधिक ऊस आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो आणि अजित पवार यांच्या अंबालिका शुगर या दोन कारखान्यांना जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी अद्यापही पहिला हप्ता जाहीर केला नाही. तरीही शेतकरी त्यांना ऊस देत आहेत. विक्रमसिंह शिंदे यांच्या विठ्ठल रिफाइंड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर यांनी पहिला जाहीर करूनही शेतकरी त्यांना ऊस घालायला तयार नाहीत. (Farmers of Karmala gave sugarcane to Pawar's factories instead of Shinde-Sawant)

तालुक्यात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव तथा करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे पुतणे विक्रमसिंह शिंदे यांचा विठ्ठल रिफाईंड शुगर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर या कारखान्यांना ऊस देण्यास शेतकरी नापसंती दाखवत आहेत. दुसरीकडे, शेजारील तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालिका शुगर आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या साखर कारखान्यांना ऊस घालण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. अर्थातच, तालुक्याचा विचार केला तर शिंदे आणि सावंत यांच्या तुलनेत पवारांची कारखानदारी सरस ठरल्याचे यावरून दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला अंबालिका शुगरने 2867 रुपये, तर बारामती ॲग्रोने 2775 रुपये भाव दिला आहे. प्रतिटन 500 ते 600 रूपये तोटा सहन करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची राहिलेली नाही. विठ्ठल रिफाइंड शुगर ने 2800 आणि भैरवनाथ ने 2725 भाव जाहीर केला असला तरी यापूर्वीचा त्यांचा अनुभव बघता शेतकरी त्यांना ऊस देण्यास टाळाटाळ करत आहेत.

SugarCane FRP Issue
Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार?; दोन मंत्र्यांच्या दबावाची चर्चा

सध्या करमाळा तालुक्यातील 80 टक्के ऊस तालुक्याबाहेरील पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस तालुक्यातील कारखान्यांना जात आहे. एकेकाळी तालुक्यातील चारही कारखाने पूर्ण क्षमतेने चालत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक उसाचे क्षेत्र असलेल्या करमाळा तालुक्यातील साखर कारखाने ऊस असूनही पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत. ही वेळ का आली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत.

मागील वर्षी विठ्ठल रिफाइंड शुगरने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे दिले नाहीत. तसेच, इतर कारखान्यांच्या तुलनेत भावही जास्त दिला नाही. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य वागणूक मिळाली नाही, त्याचा फटका चालू हंगामात त्यांना बसत आहे. मात्र, आमदार शिंदे यांच्या पिंपळनेरच्या कारखान्याला भरपूर ऊस मिळत आहे.

SugarCane FRP Issue
Solapur MIM News : तेलंगणातील यशाचे ‘टॉनिक’ एमआयएमला सोलापुरात आमदारकी मिळवून देणार...?

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी भाव दिला. जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना भावही दिला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा त्यांना ऊस घालण्यास टाळाटाळ करत आहेत. सुमारे पाच हजार टन गाळप क्षमता असूनही या कारखान्यांत सध्या दीड ते दोन हजार टन प्रतिदिनी उसाचे गाळप होत आहे. याशिवाय, कारखान्यावर 20-20 तास उसाची वाहने येण्याची वाट पहावी लागत आहे.

अंबालिका शुगर, बारडगाव (ता. कर्जत, जि.नगर), बारामती ॲग्रो, शेटफळगढे (ता. इंदापूर, जि.पुणे), गौरी शुगर, हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर), बारामती ॲग्रो, हळगाव (ता. जामखेड, जि.नगर), विठ्ठल सहकारी पिंपळनेर, विठ्ठल कार्पोरेशन, म्हैसगाव या तालुक्याबाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. तालुक्याबाहेर उस जाण्याला योग्य भाव न देणे, अतिरिक्त ऊस असताना राजकारण करणे, या गोष्टी कारणीभूत आहेत.

SugarCane FRP Issue
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

करमाळा तालुक्यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, श्री मकाई सहकारी साखर कारखाना हे सहकारी आहेत, तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव विक्रमसिंह शिंदे अध्यक्ष असलेला विठ्ठल रिफाइंड शुगर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर हे चार साखर कारखाने आहेत. या चार साखर कारखान्यांपैकी तीन साखर कारखाने सुरू आहेत, तर मकाई सहकारी साखर कारखाना बंद आहे.

विठ्ठल रिफाइंड शुगरने 30 नोव्हेंबरपर्यंत केवळ 45 हजार 269 टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याकडून 2800 रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला असून दर पाच दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत, तरीही हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नाही.

SugarCane FRP Issue
Bidri Sugar Factory Result : दोन मंत्री, दोन खासदार, सात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘बिद्री’ची मतमोजणी सुरू

भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याने 58 हजार 660 टन उसाचे गाळप केले असून 2725 रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. या दोन्ही साखर कारखान्याची क्षमता 5 हजार टन प्रतिदिन आहे. मात्र, उसाअभावी हे कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्हीही साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. मात्र, हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. मागील पंधरा दिवसांपूर्वी आदिनाथ कारखाना सुरू झाला. मात्र, त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

SugarCane FRP Issue
Congress : पिंपरी-चिंचवड शहर,जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर व्हायला तब्बल दोन वर्षे का लागली?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com