Solapur Politics : अजितदादा,जयंत पाटलांच्या दौऱ्याआधीच मुख्यमंत्री शिंदेंनी टायमिंग साधलं; राष्ट्रवादीच्या...

Shivsena Vs NCP : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्याआधीच हा शिंदे गटानं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
Solapur Politics
Solapur PoliticsSarkarnama

Solapur : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजप, राष्ट्रवादीसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरुन दावे प्रतिदावे केले जात असतानाच राष्ट्रवादीनं मात्र मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिग्गज नेत्यांना कामाला लावलं आहे.

याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याआधीच सोलापूरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेने(शिंदे गट)त प्रवेश केला आहे.

Solapur Politics
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या मनात काय? गोपीचंदभाऊ म्हणत व्यासपीठावरच दिली पाठीवर थाप...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी(दि.३१)शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष ज्योतिबा गुंड, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष गणेश छत्रबंद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष, व्यसनमुक्ती सेलचे सरचिटणीस, शहर चिटणीस यांचाही समावेश आहेत. अजित पवार(Ajit Pawar) आणि जयंत पाटील यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्याआधीच हा शिंदे गटानं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेगटात पक्षप्रवेश केला.अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाला शहरात लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान राष्टवादीसमोर असणार आहे.

Solapur Politics
Sanjay Shirsat On Sanjay Raut : राऊतांचा आविर्भाव पाहता, ते पक्षपमुख होवू शकतात, शिरसाटांनी डिवचले..

शरद पवारांच्या दौऱ्यानंतरही गळती सुरुच...

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सोलापूर दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्यानं जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत उत्साह संचारल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. पवारांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा आयत्या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणत २०२४ साठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे संकेत दिले होते.

याचवेळी सांगोलामार्गे सोलापूर शहराला भेट देत जिल्ह्याच्या राजकारणाचा, बदलत्या समीकरणांचा कानोसा घेतला होता. यावेळी सोलापुरातील मरिआई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती.

Solapur Politics
Vinayak Mete : मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्याच्या नावाने नवीन पक्ष ..

शिंदे गटाची ताकद वाढली..

मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंना आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १३ खासदारांनी बंडखोरी केली होती. यानंतर सातत्यानं शिंदेंनी ठाकरे गटासह इतर पक्षातील नेतेमंडळींना पक्षात आणत धक्क्यावर धक्के देण्यात आघाडी घेतली आहे. राज्यात विविध ठिकाणी आजी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात आणलं.

शिंदेंनी आगामीलोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर ते इतर पक्षातील नेतेमंडळींना पक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिंदे गटात खास करून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत काँग्रेसला फारशी झळ बसलेली नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com