Eknath Shinde News : अहमदनगरचे नाव लवकरच अहिल्यादेवी होळकरनगर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे केली. ही घोषणा करत असताना शिंदे यांनी व्यासपीठावरच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा गोपीचंदभाऊ असा उल्लेख करत पाठीवर थाप दिली, यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा झाली.
अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकर करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ही घोषणा केली. मात्र, चौंडीतील कार्यक्रम हा राम शिंदे (Ram Shinde) यांनी आयोजित केली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांच्या नावावरच भर दिला.
अहमदनगरच्या नामांतरासाठी पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मध्यंतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी नगरच्या नामंतराची मागणी केली होती. आता त्यांच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आजच्या चौंडी येथील कार्यक्रमामध्ये पडळकर यांचाच वरचस्मा दिसला. यामुळे धनगर समाजाचे नेते म्हणून भाजपने पडळकर यांनाच प्रोटेक्ट केल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमानंतर आभार मानताना भाजप नेते व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र, गोपीचंद पडळकर यांच्या सोबतच राम शिंदे यांनीही नगरच्या नामांतरासाठी प्रयत्न केला असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहोत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आणि चौंडीतील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा होते आहे, हे आमचे भाग्य आहे, असेही शिंदे म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.