जनतेलाही ईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवा...

Chandrakant Patil|Mahesh Tapse|BJP|NCP : चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत, असे आव्हान महेश तपासेंनी पाटलांना दिले आहे.
Mahesh Tapase
Mahesh Tapase Sarkarnama

मुंबई : कोल्हापूर पोटनिवडणूकीत (by-elections) मतदारांना ईडीची (ED) धमकी देण्यापर्यंत भाजपची (BJP) मजल गेली असून जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी केले आहे.

कोल्हापूर पोटनिवडणूकीत पेटीएमद्वारे मतदारांना पैसे दिले जातात, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला असून हा आरोप चुकीचा, बिनबुडाचा व तथ्यहिन असल्याचे प्रत्युत्तर तपासे यांनी दिले आहे.

Mahesh Tapase
मुंबईत इतिहासाची पुनरावृत्ती होणार; भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर होईल..

तापसे म्हणाले, भाजपला पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय दिसत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत, असे आव्हान तपासेंनी पाटलांना दिले आहे.

Mahesh Tapase
खासदार संभाजी राजे साधणार शेतकऱ्यांच्या मुलांशी संवाद

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमध्ये पैसे घेणाऱ्या जनतेचीही ईडी चौकशी होऊ शकते, असा इशारा दिला होता. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले असून हा प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच पत्रकार परिषदेत बोलताना पाटीलांनी कोल्हापूरच्या मतदारांना पैसे वाटण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप केला. सोबतच हे पैसे घेतलेल्या मतदारामागे ईडीची चौकशी लागेल असा इशाराही दिला होता. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com