Sharad Pawar : पवारांचा पॉवर गेम, वडगाव शेरीत पठारे V/S टिंगरे लढत रंगणार?

Sharad Pawar On Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग पाहायला मिळत आहे. माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पुण्यामध्ये शुक्रवारी जाहीर सभा घेण्यात आली होती.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपले डावपेच आखण्यास सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टाकलेल्या राजकीय डावामुळे महायुतीतील सर्वच नेते चारीमुंड्या चीत झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच शरद पवारांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेमध्ये पहिला डाव टाकला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पवारांनी कालच्या सभेत अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यामुळे आता वडगाव शेरी मतदारसंघात टिंगरे विरुद्ध पठारे अशी लढत होईल, अशी जोरदार चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग पाहायला मिळत आहे. नुकतंच पुणे (Pune) शहरातील माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पुण्यामध्ये शुक्रवारी जाहीर सभा घेण्यात आली.

पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या या सभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यापूर्वी झालेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचं सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar
Maratha Reservation : "जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार..."; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

तर या सभेतून शरद पवार हे अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात थेट मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी टिंगरे यांचा समाचार घेत शरद पवार म्हणाले, "पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा प्रयत्न वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केला.

भरधाव कारने दोन तरुणांना उडवले, त्यांचा जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला, अशा वेळेला जे जखमी झाले, त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि अल्पवयीन चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती का? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्याचे उत्तरदायित्व या पद्धतीने याने केले? चुकीच्या प्रवृत्तींना त्याने पाठिशी घातले. त्यांना सत्तेचा माज चढला असून, त्यांचा बंदोबस्त मतदार करतील", असे सांगत शरद पवारांनी टिंगरे यांचा चांगला समाचार घेतला.

अशा पद्धतीने शरद पवार हे अजित पवार यांच्या आमदाराच्या विरोधात थेट मैदानात उतरल्याने आता जोरदार वारं फिरणार असल्याच्या चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे टिंगरे विरुद्ध पठारे अशी लढत होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. असं असलं तरी जुनियर पठारे लढणार की सीनियर पठारे हे अध्याप स्पष्ट झालेलं नाही.

Sharad Pawar
Vivek Kolhe : '3000 कोटींचा हिशोब द्या'; विवेक कोल्हेंचं चॅलेंज अजितदादांचा आमदार स्वीकारणार का?

तुतारीचा उमेदवार मुलगा की वडील

त्यामुळे तुतारीचा उमेदवार मुलगा की वडील याबाबत अध्यापही उत्सुकता आहे. माजी आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे याचे सोसायटी वर्गामध्ये मोठे काम आहे. ते स्वतः 'सीओईपी'चे इंजिनियर आहेत. त्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे तरुण वर्गाकडून सुरेंद्र पठारे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात येत आहे.

तसेच बापू पठारे यांचा ग्रामीण भागात आणि वस्ती भागात आजही दांडगा संपर्क आहे. याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे वडगाव शेरी येथील विधानसभेची निवडणूक ही अतिशय रंजक होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com