Mehboob Shaikh: संजय मामांना आस्मान दाखवायचं का, मामागिरी बंद करायची का?

Mehboob Shaikh Criticism Karmala MLA Sanjay Mama Shinde: नारायण आबा, तुम्ही अशा वास्तूत त्याच्या तालमीत आला आहात की शरद पवारांना ही माहिती आहे, कुणाला कुठे कसा डाव टाकायचा त्यामुळे तुम्ही निश्चित राहावा.
Mehboob Shaikh news
Mehboob Shaikh newsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: 'नारायण आबा पाटील हे पैलवान आहेत त्यांना फेटा चांगला बांधता येतो, पैलवान माणूस कधीच खोटे बोलत नसतो, जे काय आहे ते सरळ असते. समोरचा माणूस मामा आहे. आबा, तुम्ही फेटा बांधण्यात पटाईत आहात, तर तो मामा 'टोप्या' घालण्यात पटाईत आहे. या निवडणुकीत या मामाला आसमान दाखवायचे आहे आणि 'मामागिरी' बंद करायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी करीत आमदार संजय मामा शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात महेबुब शेख बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत करमाळ्यात नारायण पाटील उमेदवार असतील, हे जाहीर केले आहे.

महेबूब शेख म्हणाले, "आमदार संजय मामा शिंदे यांनी कुणाकुणाला 'मामा' बनवले नाही. मागच्या निवडणुकीत पवारसाहेबांच्या पाठिंबा घेतला निवडून आले आणि सर्वात अगोदर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार झाले पुन्हा एकदा पठ्ठ्या महाविकास आघाडी सरकारकडे आले. मामा तुम्ही नेत्यांना मामा बनवलंय...जनतेला मामा बनवलंय... पण यावेळी करमळ्याची जनता तुम्हाला मामा बनवल्याशिवाय राहणार नाही,"

'गडी एका जागेवर कधी स्थिर नाही. आमदार संजय मामा शिंदे यांना शरद पवार साहेबांनी मागच्या निवडणुकीत उभा केले. नंतर अपक्ष उभे केले ,पाठिंबा दिला, काय कमी केले तुम्हाला पवारसाहेबांनी आत्ताची लोकसभा निवडणूक झाली आणि सिल्वर ओककडे डोळे लावून बघायला लागलेत. आता लोटांगण सुरू केलेय. दोघेही भाऊ भाऊ पवारसाहेबांकडे चक्करा मारू लागले आहेत. मात्र ज्यांनी ज्यांनी पक्षाबरोबर पवार साहेबांबरोबर गद्दारी केली. पक्ष चोरायला मदत केली आहे . पक्ष फोडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्या एकाही गद्दाराला परत घ्यायचं नाही,' अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Mehboob Shaikh news
Video राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी कुणाची वर्णी; भुजबळ, बाबा सिद्दीकी की आनंद परांजपे?

करमाळा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला शरद पवारसाहेबांच्या विचाराचा पैलवान नारायण आबा पाटील यांना विधानसभेत पाठवायचे आहे. नारायण आबा, तुम्ही अशा वास्तूत त्याच्या तालमीत आला आहात की शरद पवारांना ही माहिती आहे, कुणाला कुठे कसा डाव टाकायचा त्यामुळे तुम्ही निश्चित राहावा.

आम्ही यापूर्वी त्या संजय मामा शिंदे यांच्याकडे यायचो, तेव्हा संजय मामा आम्हाला 'मामा' बनवायचे. एका छोट्या खोलीत बैठका घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार यात्रा त्यांनी तीनशे लोकांमध्ये घेतली आणि आज नारायण आबा यांनी घेतलेला मेळावा बघा.यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसतेय. शरद पवार, विजय दादांची ताकद काय आहे ते दिसून येते आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com