Video राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी कुणाची वर्णी; भुजबळ, बाबा सिद्दीकी की आनंद परांजपे?

Rajya Sabha Election Ajit Pawar Group Discussion: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय गणितं लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
rajya sabha seat to ajit pawar group discussion
rajya sabha seat to ajit pawar group discussionSarkarnama
Published on
Updated on

येत्या 3 सप्टेंबरला राज्यसभेची (Rajya Sabha Election)निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत.यातील एक जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे, या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal), बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे (Anand Paranjape), नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

समीर भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे यांची याबाबत आज बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय गणितं लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या 2 जागांसाठी निवडणूक होत आहे.यातील एक जागा भाजपकडे आहे.

२०१९ मध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (श्रीनिवास पाटील) जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने महायुतीत धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली. ‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला’ असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केले होते.

rajya sabha seat to ajit pawar group discussion
VIDEO काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; 'क्रॉस व्होटिंग' कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम ठोकणार

राष्ट्रवादीच्या हक्काची सातारा लोकसभेची जागा अजित पवारांनी नितीन पाटलांसाठी महायुतीकडून मागून घेतली होती. पण उदयनराजेंनी आग्रह धरल्याने त्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना राज्यसभेची जागा देण्याचे कबुल केले.

अजित पवारांनी वाईच्या सभेत जोरदार भाषण करताना वाईतून उदयनराजेंना एक लाखांचे मताधिक्य द्या, नितीन पाटलांना निकालानंतर राज्यसभेवर घेऊन खासदार करतो, असा शब्द दिला होता. त्यामुळे अजित पवार हे नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळतील का असा प्रश्न विचारला जात आहे.

नितीन पाटील यांच्याऐवजी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. जानकर यांनी अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती पण ते पराभूत झाले होते. त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाईल, असे म्हटले जात होते पण त्यांना संधी दिली गेली नाही. आता राज्यसभेसाठी त्यांचे नाव मागे पडल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com