Satara NCP News: डॉ. अजय तावरे यांना अटक हा सुसंस्कृत कोरेगावला लागलेला काळा डाग...

Porsche Crash Case: किडनी रॅकेट प्रकरणी डॉ. अजय तावरे यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून काही लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, याबाबतही चौकशी झाली पाहिजे, असे जगदाळे म्हणाले.
Pune Porsche Dr Ajay Taware
Pune Porsche Dr Ajay TawareSarkarnama

Satara NCP News: पुणे येथील कल्याणीनगर येथील अपघात (Porsche Crash Case) प्रकरणातील अल्पवयीन संशयिताचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपावरून डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) यांना झालेली अटक हा सुसंस्कृत कोरेगाव तालुक्याला लागलेला काळा डाग आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार जगदाळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुणे येथील कल्याणीनगर येथील अपघातात दोन निष्पाप जीव गेले आहेत. या अपघातानंतर ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अल्पवयीन संशयिताच्या रक्ताचे नमुने घेतले; परंतु डॉ. तावरे यांच्या सांगण्यावरून ते रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत फेकून देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यावर अल्पवयीन संशयिताचे नाव लिहिल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले असल्याचे आणि एकूणच हा प्रकार गंभीर असल्याचे नमूद करून जगदाळे (Rajkumar Jagdale) यांनी सांगितले.

Pune Porsche Dr Ajay Taware
Ajit Pawar News: नितीन पाटलांना दिलेला शब्द अजितदादा पूर्ण करणार; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच...

यापूर्वी ससूनचे सुपरिंटेंडेंट असताना डॉ. तावरे यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्यावर किडनी तस्कर प्रकरणातही आरोप झाले होते. उंदीर दंश मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. किडनी रॅकेट प्रकरणी विधानसभा, विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी कारवाई होऊ नये म्हणून काही लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतही चौकशी झाली पाहिजे, असे जगदाळे म्हणाले.

कारवाई न झाल्यामुळेच असा प्रकार करण्याचे धाडस वाढले आहे. पूर्वीच कारवाई झाली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. आता पुणे येथी कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील अल्पवयीन संशयिताचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपावरून डॉ. अजय तावरे यांच्यासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. याप्रकरणी डॉ. अजय तावरे यांना झालेली अटक हा सुसंस्कृत कोरेगाव तालुक्याला लागलेला काळा डाग आहे, असे जगदाळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणावरुन एकीकडे राजकारण तापले असतानाच रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता तांत्रिक तपासणीतून अपघात कसा झाला, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

ही पोर्श मोटार ऑनलाइन सिस्टीम ऑपरेटेड’ आहे. तिचा डेटा रिकव्हर करण्याचे काम करण्यात येत आहे. मोटारीचा ब्रेक किती वेळा दाबला? अपघातावेळी मोटारीचा वेग किती होता? किती वेळा ॲक्सिलेटर देण्यात आला? या बाबी स्पष्ट होतील. कंपनीकडून हा महत्त्वपूर्ण डेटा पोलिसांना प्राप्त होइल. मोटारीतील कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून अपघात कसा झाला, हेही आता तपासणीतून स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com