Ajit Pawar News: नितीन पाटलांना दिलेला शब्द अजितदादा पूर्ण करणार; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच...

Ajit Pawar on Rajya Sabha Satara Seat: अजित पवार यांनी जरी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार असून सातारा जिल्ह्यातील नेत्यालाच संधी दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले जाणार हे निश्चित झाले आहे.
Nitin Patil Rajya Sabha Satara Seat
Nitin Patil Rajya Sabha Satara SeatSarkarnama

Satara NCP News मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार असल्याचे सांगत सातारा जिल्ह्यातील नेत्यालाच यासाठी संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील इच्छुक होते. या बदल्यांत त्यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द खुद्द अजितदादांनी वाईतील सभेत दिला होता. त्यामुळे नितीन पाटील यांचा राज्यसभेवर (Rajya sabha Election 2024) जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभेच्या महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. पण, खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेसाठी आग्रही राहिले.उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला. पण, उदयनराजेंनी सर्वांना नकार देत सातारा लोकसभा लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांच्या १२ याद्या जाहीर झाल्या होत्या. पण त्यापैकी एकाही यादीत उदयनराजेंचे नाव नव्हते. शेवटच्या टप्प्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव आले.

Nitin Patil Rajya Sabha Satara Seat
Latur Lok Sabha 2024 Analysis: काका-पुतण्याची जोडी काँग्रेसचा हात मजबूत करतील का?

त्यामुळे उदयनराजेंचे नाव निश्चित करताना अजित पवारांना राज्यसभेची रिक्त होणारी जागा देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यानुसार अदलाबदली करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाई येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील (Nitin Patil) हे सातारा लोकसभेसाठी इच्छुक होते. पण, त्यांना आपण राज्यसभेवर घेऊन खासदार करणार असल्याचा शब्द भर सभेत अजित पवार यांनी दिला. त्यामुळे साताऱ्याला दोन खासदार मिळणार अशी चर्चा सुरु झाली. यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी उदयनराजेंना वाईतून मताधिक्य देण्याचे आवाहन वाईतील मतदारांना केले होते. त्यानुसार मतदारांनी काम केले असेल तर उदयनराजेंना वाईतून मताधिक्य मिळेल. त्यांना मताधिक्य मिळाले नाहीतर भाजप या राज्यसभेच्या जागेबाबत विचार करण्याची शक्यता आहे.

Nitin Patil Rajya Sabha Satara Seat
Pune Police: पुणे 'कार'नामा; आरोपीच्या बापाचा डॉक्टरांना आला फोन अन् रक्ताचे सॅम्पल डस्टबिनमध्ये...

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार असून सातारा जिल्ह्यातील नेत्यालाच संधी दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले जाणार हे निश्चित झाले आहे. आता उदयनराजेंचा निकाल काय लागणार यावर सर्व घडामोडीवर हे सर्व अवलंबून राहणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी भर सभेत दिलेला शब्द पाळताना भाजपची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेवर नितीन पाटील यांना संधी मिळाली तर साताऱ्याला दोन खासदार मिळतील. यामध्ये सातारा लोकसभेचा एक आणि राज्यसभेचा एक असेल.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com