
Sangli News : सांगली लोकसभा मतदार संघातून खासदार विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडूण आले आहेत. त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला असून ते लोकसभेत काँग्रेसचे 100 वे खासदार आहेत. पण त्याच्या प्रवेशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चंग बांधला असून एक नाही तीर तीन तीन वेळी विशाल पाटील यांना भाजपची ऑफर मंत्री पाटील यांनी दिली आहे. तर विशाल पाटील यांनी देखील आगामी काळात आपण कोणत्या पक्षात असू याची शाश्वती नसल्याचे सांगत भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले असून आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना गुगली टाकली आहे. ज्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटील यांनी, खासदार विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पक्षांचे ऑफर येत आहेत. पुढेही त्यांना अशा ऑफर येतच राहणार आहेत. यामुळे कुठे जायचे, काय करायचे? हा त्यांचा प्रश्न आहे. याबाबत त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी सांगलीच महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, विशाल यांना भाजपने दिलेल्या ऑफरबाबत विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, ‘ऑफर दोन प्रकारच्या असतात. पहिला प्रकार म्हणजे खरंच बोलवून ऑफर दिली जाते. ज्याची माहिती बाहेर कळत नाही. दुसऱ्या प्रकारात उगाच बाहेर ऑफर देऊन चर्चा घडवत राहायची असते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. सध्या अशीच चर्चा विशाल पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले असून त्यांना विविध पक्ष त्यांना बोलवत आहेत. ते बोलवतच राहणार. यामुळे कुठे जायचे, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त गांधी यांच्याशी चर्चा करताना नगरसेवकांनी केलेल्या आरोपावर देखील त्यांनी सूचना केल्या. गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटातील नगरसेवकांवर निधी वाटपात अन्याय होत असल्याची तक्रार जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. यावरच जयंत पाटील यांनी आयुक्त गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी, निधी वाटपात कोणताच दुजाभाव न करता समतोल राखण्यात यावा, अशा सूचना गांधी यांना दिल्या आहेत.
‘आलमट्टी’प्रश्नी मंत्र्यांना टोला
यावेळी जयंत पाटील यांनी, ‘आलमट्टी’प्रश्नी राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीला विरोधकांना न बोलावण्याचा समाचार घेतला. जयंत पाटील म्हणाले, ‘नदीकाठचे आमदार न बोलावता दूरवरील आमदारांना बोलावून बैठक घेण्याची भूमिका काय? हे काही कळलं नाही? जलसंपदा मंत्री अनुभवी आहेत, तरीही असे का वागले हे देकील कळतं नाही. कदाचित आलमट्टी धरणाचा परिणाम होत नाही, अशी सरकारची बाजू दिसते आहे. पावसाळा सुरू झाल्यावर कळेल, काय होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. आताही त्यांनी, सिन्नर तालुक्यात काढून घेतलेल्या पिकांच्या ढेकाळाचे पंचनामे करायचे का? असा विधान केले होते. त्यावरून राज्यभर टीका होताना दिसत आहे. यावरून जयंत पाटील यांनी, मे महिन्याच्या अखेरीस सलग पडलेल्या पावसाने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एक पीक वाया जाण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले पाहिजेत. त्याउलट ‘ढेकळाचे पंचनामे करायचे का,’ असे मंत्री म्हणत असतील तर ते खेदजनक असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.