Madha News : माढ्यात राष्ट्रवादी भाकरी फिरवणार; संजीवराजेंसाठी चाचपणी...

Sanjivraje Naik Nimbalkar २०१९च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दयावी, अशी मागणी होत होती. ते प्रमुख दावेदार मानले जात होते.
Sharad Pawar, Sanjivraje Naik Nimbalkar
Sharad Pawar, Sanjivraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : राष्ट्रवादीचे फलटणचे Phaltan NCP नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर Sanjeevraje Nimbalkar यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. २०१९ ला राष्ट्रवादीने केलेली चुक २०२४ च्या लोकसभेत सुधारावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आहे. संजीवराजे यांना अकलूजला मोहिते-पाटील Mohite- Patil यांनी ताराराणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून बाोलवले होते. त्यामुळे माढा मतदारसंघात संजीवराजेंच्या वाढलेल्या दौऱ्याच्या पार्श्वभीमवर चर्चांना उधाण आले आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दयावी, अशी मागणी होत होती. तसे ते प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीने संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली. पण राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला.

त्यामुळे २०१९ मधील अनुभव लक्षात घेता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी माढातून राष्ट्रवादीकडून संजीवराजे नाईक निंबाळकर हेच उमेदवार असू शकतील. या मतदारसंघातून निवडणूक लढायची असेल तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची साथ महत्वाची ठरणार आहे.

Sharad Pawar, Sanjivraje Naik Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkar : नगराध्यक्ष ते विधानपरिषदेचे सभापती; असा आहे रामराजे नाईक निंबाळकरांचा राजकीय प्रवास

त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास संजीवराजेंची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आगामी निवडणुकीची चाचपणी मानली जात आहे. आता राष्ट्रवादीने २०१९ मध्ये केलेली चुक २०२४ मध्ये सुधारावी व संजीवराजेंना उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सध्या या मतदारसंघात रंगली आहे.

Sharad Pawar, Sanjivraje Naik Nimbalkar
Phaltan : गडकरींच्या कार्यक्रमाला रामराजेंची उपस्थिती; अनेकांच्या भुवया उंचावल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com