हर्षवर्धन पाटलांना 'बाय' देण्याचे राष्ट्रवादीने सांगितले हे कारण

हर्षवर्धन पाटील यांना आयतेच बळ मिळाले आहे.
Dattatraya Bharane, Harshvardhan Patil, Pradeep Garatkar
Dattatraya Bharane, Harshvardhan Patil, Pradeep Garatkar sarkarnama
Published on
Updated on

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना (Shankarraoji Patil Sahakari Sugar Factory) हा राजकारणाचे माध्यम नसून गोर गरीब शेतकऱ्यांचे प्रपंच चालविण्याचे साधन आहे. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी राजकारण करणार नाही. मात्र, ज्यांनी कारखाना कर्जबाजारी करून ठेवला आहे. त्यांनी सभासद हित केंद्रस्थानी मानून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे असल्याने कर्मयोगी कारखाना निवडणूकीत पक्षाचे पॅनेल उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी दिली. (NCP withdraws from Shankarraoji Patil Sahakari Sugar Factory elections)

Dattatraya Bharane, Harshvardhan Patil, Pradeep Garatkar
रजनी पाटील यांचा अर्ज बाद होऊ शकतो; भाजप नेते लागले कामाला

गारटकर म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत खासदार शंकरराव पाटील, नंतर त्यांच्या पत्नी कै. लीलावती पाटील यांनी सभासदांच्या हितास प्राधान्य देवून कारखाना कर्जमुक्त केला. मात्र, हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यानंतर सभासदांवर अन्याय सुरू झाला. इतर कारखान्याच्या तुलनेत सभासदांना टनामागे ४०० ते ५०० रुपये दर कमी मिळत आहे, असा आरोप गारटकर यांनी केला.

कर्मयोगी कारखान्याच्या नावावर मशिनरी खरेदी करून ती खाजगी कारखान्यात वापरली जात आहे. ऊसवाहनांचा करार कर्मयोगीवर आणि त्याचा वापर खाजगी कारखान्यात केला जात आहे. त्याचे पैसे मात्र कर्मयोगीतून दिले जात आहेत. त्यामुळे कारखाना कर्जबाजारी झाला आहे. ऊस उत्पादकांचे गेले नऊमहिन्या पासून पेमेंट नाही, कामगारांचे दहामहिन्याचे पगार थकीत आहेत. विरोधक ऊस उत्पादक सभासदांच्या अनामत रक्कम भरून घेतल्या आहेत. मात्र, त्यांना सभासद करून घेतले जात नाही. विरोधकांच्या ऊसाचे पाच वर्षापासून गाळप न करता त्यांचे सभासदत्व रद्द केले. जाते तर वारसा हक्काने वारसदारांना सभासद केले जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बागायतदार पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व जाणीव पूर्वक रद्द करून त्यांना उमेदवारीपासून कायदेशीर रित्या दूर ठेवण्यात आले आहे.

Dattatraya Bharane, Harshvardhan Patil, Pradeep Garatkar
रजनी पाटील यांचा अर्ज भरताना रंगली एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीची चर्चा

त्यामुळे निवडणूक जिंकली तरी कारखान्याचा कारभार नीट चालविता येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पक्षाने पॅनेल उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. मिनी आमदारकीची निवडणूक असल्याने सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निवडणुकीत लक्ष घालावे अशी सभासदांची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने हर्षवर्धन पाटील यांना आयतेच बळ मिळाले आहे.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कर्मयोगी कारखाना निवडणुकीत पॅनेल उभे न करण्याचा निर्णय घेवून माजी सहकार मंत्री यांना बाय दिला आहे. तसेच भाजपचा विजय अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. यानिवडणुकीत जे कारखान्याचे सभासद देखील नाहीत. त्यांनी काही प्रशचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. सभासदशेतकरी यांच्या आर्थिक हितास नेहमीच प्राधान्य दिले जाते. हे गेल्या ३२ वर्षापासून सभासदांना माहिती आहे. मात्र, एकीकडे राजकारणासाठी राजकारण करायचे नाही. असे म्हणायचे दुसरीकडे मात्र तोंडसुख घ्यायचे हे चुकीचे आहे .अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com