Mangalwedha News : अजितदादांनी बशीर बागवान यांची केली आस्थेवाईकपणे विचारपूस : मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

NCP News : मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Mangalvedha News : मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजिदादांनी माजी नगरसेवक बशीर बागवान यांची विचारपूस केल्याने मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. मंगळवेढ्यातील पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष पवार यांना मानणारे असले तरी अजित पवार हे देखील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहा सभा घेतल्या. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना व यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये देखील मंगळवेढ्यासाठी निधी देताना अजितदादांनी खास लक्ष देत मदत केली आहे. त्यामुळे मंगळवेढ्यातील राजकीय पदाधिकारी आणि अजितदादा यांचे सातत्याने संबंध राहिले आहेत.

Ajit Pawar News
Jalgaon politics : पक्ष कसा सांभाळायचा शरद पवारांकडून राऊतांनी शिकावे : गुलाबराव पाटलांचा टोला

पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. यावेळी पांडुरंग ताड, प्रकाश गायकवाड, पै. ज्ञानेश्वर भगरे, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, राहुल सावजी, संभाजी घुले, बशीर बागवान उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळातील इतर सदस्यांबरोबर बागवान यांची विशेष विचारपूस केली. बागवान यांनी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले आहे. केळी व्यवसायातून राजकारण करताना त्यांनी सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत.

Ajit Pawar News
Nana Patole On Phone Tapping : फडणवीस गृहमंत्री होताच फोन टॅपिंगप्रकरणी शुक्लांना क्लिनचीट मिळतेच कशी ? पटोलेंचा सवाल !

ज्या ज्या वेळेला विकासकामाला निधी व पक्ष बैठकांसाठी अजितदादांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ बारामतीला जात होते. त्या त्या प्रत्येक वेळी बशीर बागवान हे नेहमी उपस्थित राहत असल्यामुळे ते अधिक परिचयाचे झाले. शुक्रवारच्या भेटीत देखील अजितदादांनी तालुक्याच्या राजकीय परिस्थिती जाणून घेण्यापूर्वी बशीर बागवान यांची विचारपूस केल्यामुळे उपस्थित नगरसेवक देखील अवाक झाले. कार्यकर्त्यांप्रती नेता देखील किती आदराने वागतो याचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने पाहता आल्याची भावना सगळ्यांची होती.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com