आघाडी धर्म टाळत राष्ट्रवादीचीच भाजपशी दळभद्री युती... आमदार गोरे, देशमुखच राजकिय शत्रू...

आम्हीही आमच्या स्थानिक कार्यकर्ते Local Supporters व नेतेमंडळींना स्थानिक निवडणुकांत स्वातंत्र्य दिलेय. त्यामुळे ते कोणाशी युती करतात याकडे आपण लक्ष देत नाही, असेही जिल्हा बँकेचे DCC संचालक शेखर गोरे Shekhar Gore यांनी स्पष्ट केले आहे.
Shekhar Gore
Shekhar Goresarkarnama

बिजवडी : गोरे बंधूची युती असे सांगत त्या नावाखाली राष्ट्रवादी आपला राजकीय स्वार्थ साधून घेत आहे. आमदार जयकुमार गोरेप्रभाकर देशमुख हे दोघेही आपले राजकीय शत्रू असल्याने त्यांच्याशी युतीचा विषयच येत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत व पंचायत समितीत युती करणाऱ्या राष्ट्रवादीने अन्‌ दळभद्री बोलघेवड्यांनी आमची मापे काढू नयेत, असा इशारा सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

राज्यात आघाडीचे सरकार असताना आघाडी धर्म न पाळता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपशी युती करते. माण पंचायत समितीत शिवसेनेच्या सभापतीविरोधात अविश्वास आणायला राष्ट्रवादी भाजपला बरोबर घेत दळभद्री युती करते. अन्‌ चोराच्या उलट्या बोंबा मारत दहिवडीत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी केलेल्या युतीला गोरे बंधूची छुपी, अभद्र युती म्हणताना विरोधकांना लाजा वाटायला हव्यात.

Shekhar Gore
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

गोरे बंधूची युती असे सांगत त्या नावाखाली राष्ट्रवादी आपला राजकीय स्वार्थ साधून घेत आहे. आमदार जयकुमार गोरे व प्रभाकर देशमुख हे दोघेही आपले राजकीय शत्रू असल्याने त्यांच्याशी युतीचा विषयच येत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत व पंचायत समितीत युती करणाऱ्या राष्ट्रवादीने अन्‌ दळभद्री बोलघेवड्यांनी आमची मापे काढू नयेत.

Shekhar Gore
"माझ्या संपर्कात रहा" : साताऱ्यात आदित्य ठाकरेंचा शेखर गोरेंना खास मेसेज

शेखर गोरे म्हणाले, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन बाजार समिती, दहिवडी नगरपंचायत आदी निवडणूका लढवण्याचा व आघाडी धर्म पाळण्याचा शिवसेनेने अनेकदा प्रयत्न केला. परंतू या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आमच्याच पक्षाची मापे काढत आघाडी धर्म न पाळता सवता सुभा करतात. त्यामुळे आम्हीही आमच्या स्थानिक कार्यकर्ते व नेतेमंडळींना स्थानिक निवडणूकात स्वातंत्र्य दिलेय. त्यामुळे ते कोणाशी युती करतात याकडे आपण लक्ष देत नाही.

Shekhar Gore
शेखर गोरेंचे नशीब जोरात चिट्ठीवर गेले जिल्हा बॅंकेत

काही ठिकाणच्या सोसायट्या घेतल्या म्हणून राष्ट्रवादीचे हवेत जावू नये. आम्ही प्रत्येक सोसायटीत सहभाग घेतला तर तुम्हाला अवघड जाईल. मी एखाद्या निवडणूकीत लक्ष घातल्यानंतर काय करतो ते विरोधकांनाही माहित आहे. त्यामुळे विरोधकांनी बेताल वक्तव्ये करताना जपून करावीत.

Shekhar Gore
शेखर गोरेंची बहिणीला भाऊबीज! नगरपंचायतीत शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध

राजीनामा देऊन पुन्हा लढा...

शेखर गोरेंनी एखाद्या निवडणूकीत लक्ष घातलं तर ती निवडणूक कसे लढतो हे विरोधकांनाही चांगलच माहित आहे. गोरे बंधूंची युती म्हणणाऱ्यांना माझे एक सांगण आहे की, तुमच्यात एवढीच खुमखुमी असेल तर दहिवडी सोसायटीत पुन्हा एकदा राजीनामे देऊन निवडणूक लढवावी. शिवसेना तुमच्या विरोधात कुठेही लढायला तयार आहे. मग, शेखर गोरे निवडणूकीत उतरवल्यावर काय होत ते दाखवून देतो, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com