आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध प्रकारची १४ आणि ॲट्रॉसिटी atrocity कायद्यातंर्गत दोन कलमे लावण्यात आली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी Sub division police officer नीलेश देशमुख Nilesh deshmukh अधिक तपास करत आहेत.
MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

मायणी : येथील मयत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून भाजपाचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे ( बिदाल, ता. माण ) व अज्ञात दोघांनी संगनमत करून जमीन हडपण्यासाठी फसवणूक केली आहे. त्या प्रकरणी गोरे सह पाच व्यक्तींवर ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार ) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Atrocity charged on Jaykumar Gore News)

त्यासंबंधीची फिर्याद मयत पिराजी भिसे यांचे वारसदार महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलिसांत दाखल केली आहे. याबाबतची माहिती अशी : मायणी येथील पिराजी विष्णू भिसे हे आठ ऑक्टोंबर २०१६ रोजी वृद्धापकाळाने मयत झाले आहेत. त्यांचे नावे गट नं ७६९, ७८१ व ८१२ मध्ये वडिलोपार्जित जमिन आहे. त्यांचे वारस म्हणुन पत्नी नमुनाबाई पिराजी भिसे, मुले महादेव भिसे, शंकर भिसे, हरि भिसे, विठ्ठल भिसे, मुली लक्ष्मी नाथा वायदंडे व रुक्मिणी शशिकांत अवघडे यांचेसह शुभम शिवाजी भिसे हे वहिवाट करीत आहेत.

MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Gore
भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

वडिलोपाजीत मिळकत गट नं ७६९, लगत गट नं ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी मायणी तर्फे तत्कालीन अध्यक्ष यांचे मालकी कब्जात वहिवाटीचे आहे. विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार भगवान गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसल्याने त्यांनी भिसे यांच्या वडिलोपार्जित मिळकतीतून रस्ता मागणीसाठी सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचे कार्यालयाकडे अर्ज दिलेला होता. त्यानुसार सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियमानुसार पंधरा मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी लागणारी जमीन व संबंधित मालकाची परवानगी घेणे बंधनकारक होते.

MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Gore
राष्ट्रवादीला शिंगावर घेण्यासाठी भाजपने आखली रणनिती: जिल्हाध्यक्षपदी जयकुमार गोरेंची निवड

मात्र, तशी कोणतीही परवानगी न घेता आमदार गोरे यांनी दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे, व अज्ञात दोघे (प्रतिज्ञापत्रावर सही करणारा आणि बोगस आधारकार्ड तयार करणारा) यांनी संगनमत करून मयत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार केली. मयत भिसे यांचे जागी कोणी तरी अज्ञात इसम उभा करून त्याचे नावे ११ डिसेंबर २०२० रोजी दहिवडी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र करण्यात आले आहे. भिसे कुटुंबाची फसवणुक करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेय कोंडीबा घुटुकडे यांचे नावे शंभर रुपयांचा स्टॅम्प घेऊन प्रतिज्ञापत्रात बोगस व खोटा मजकुर लिहिण्यात आला आहे.

MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

तसेच भिसे यांच्या मुळ आधारकार्डाची छेडछाड करुन बनावट आधारकार्ड तयार करून घेण्यात आले आहे. मूळ आधारकार्ड नं ९०१३१५२०१५९५ असा असताना तो ५०७२१५७८८२१३ करण्यात आला आहे. भिसे अडाणी व अशिक्षित होते. त्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नव्हते. मात्र, प्रतिज्ञापत्रावर इंग्रजीमध्ये त्यांच्या नावे सही करून दुस-याच तोतया अनोळखी इसमाचा फोटो लावला आहे. ती सर्व बोगस कागदपत्रे सहाय्यक संचालक नगररचना सातारा उपविभागीय अधिकारी माण खटाव यांच्या कार्यालयात दाखल करून फसवणुक करण्यात आली आहे.

MLA Jaykumar Gore, Atrocity charged on Jaykumar Gore
सातारा पोलिसांनी सदावर्तेंना घेतलं ताब्यात; दीड वर्षांपुर्वीचं वक्तव्य भोवणार

त्यामुळे आमदार जयकुमार भगवान गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे, अनोळखी इसम (पिराजी विष्णु भिसे यांचे नावे ऑफिडेव्हीट करणारा व बनावट आधारकार्ड बनविणारा संगणकतज्ज्ञ यांचेवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करून न्याय मिळाला, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध प्रकारची १४ आणि ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत दोन कलमे लावण्यात आली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश देशमुख अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com