NCP News : राष्ट्रवादीचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

अमित शहा यांनी गैरसमजुतीतून हे विधान केलं असावं.
Hasan Mushrif-Amit Shah
Hasan Mushrif-Amit ShahSarkarnama

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज (ता. १९) कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटातून एक बातमी आली आहे. राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या भेटीची चर्चा पुन्हा रंगणार आहे. (NCP's Hasan Mushrif will be meet Amit Shah)

काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा पडला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यापूर्वीही एकदा मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी शहा यांची भेट घेण्याचे जाहीर केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Hasan Mushrif-Amit Shah
Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी बोलताना कोल्हापूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेवर प्रशासक असल्याचे म्हटले होते. मात्र ही माहिती चुकीची आहे. गैरसमजुतीतून त्यांच्याकडून हे वक्तव्य झालं असावं, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात अमित शहा यांचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना आपण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन भेटणार आहोत, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मात्र, ही भेट कधी होणार, हे मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेले नाही. त्याबाबतची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

Hasan Mushrif-Amit Shah
Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

मुश्रीफ यांचे वक्तव्य आणि अमित शहा हे कोल्हापुरात असणे, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुश्रीफ प्रत्यक्षात आज शहा यांना भेटतात की पुन्हा भेटतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मात्र, या भेटीबाबत मुश्रीफ यांच्याकडून पुष्टी मिळू शकलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com