Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

हा प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक आपल्या नियमांमध्ये शिथिलता आणत असल्याचे सूतोवाच शहा यांनी केले.
Amit Shah-Harshvardhan Patil
Amit Shah-Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : इथेनॉल निर्मितीसाठी प्रकल्पासाठी पतपुरवठा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणारे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा उल्लेख देशाचे सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आपल्या भाषणात केला. ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ असे सांगून त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक आपल्या नियमांमध्ये शिथिलता आणत असल्याचे सूतोवाच शहा यांनी केले. (Amit Shah mentioned Harshvardhan Patil in his speech)

'सकाळ'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाकर महापरिषदेचा समारोप देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या भाषणाने झाला. त्या भाषणात शहा यांनी देशातील सहकार सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना याबाबत मार्गदर्शन केले. त्यात बोलताना शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख केला.

Amit Shah-Harshvardhan Patil
MAHA CONCLAVE : सहकार विद्यापीठ स्थापन करणार : अमित शहा

ते म्हणाले की, पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के जैव इथेनॉल मिसळण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत १० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ठ ठेवले होते. पण, मला सांगायला आनंद वाटतो की, नोव्हेंबरऐवजी सप्टेंबरमध्ये हे १० टक्क्यांचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केले होते. सध्या आम्ही १२ टक्क्यांर्यंत पोचलो आहोत. ही मोठी उपलब्धी आहे. इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये केल्यामुळे १० टक्के इंधन आयात घटली आहे. याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत. सुमारे ४१ हजार ५०० कोटी रुपये विदेशी चलन आपण या निर्णयातून वाचवले आहेत.

Amit Shah-Harshvardhan Patil
MAHA CONCLAVE : नवी सहकार नीती बनविण्यासाठी सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली समिती : अमित शहांची घोषणा

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयाचा अनेक साखर कारखान्यांना फायदा झाला आहे. तसेच, २७ लाख टन कार्बन उत्सर्जनही कमी झाले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर २० टक्क्यांपर्यंत गेल्यास वातावरणात सध्या निर्माण होणार कार्बन आणखी २७ लाख टनांनी घटणार आहे, त्यामुळे या इथेनॉल मिश्रणाचा फायदा पर्यावरण रक्षणासाठी झाला आहे. इथेनॉलवरील १८ टक्के जीएसटी घटवून ती पाच टक्क्यांवर आणली आहे. त्याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे, असेही सहकार मंत्र्यांनी नमूद केले.

Amit Shah-Harshvardhan Patil
Solapur Election : मोहिते-पाटील, शिंदे, काळे, पाटील, बागलांची प्रतिष्ठा पणाला लागणार : डीसीसीसह ४ काखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू

‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’. एक प्रश्न आहे की, ‘इथेनॉल’साठी फायन्सास (पतपुरवठा मिळावा,) मिळत नाही. काही सहकारी साखर कारखान्यांची परिस्थिती खराब आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार, असा निर्णय एनसीडीसीने घेतलेला आहे. तसेच, सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मिळावे, या साठी रिझर्व्ह बॅंकही नियमांमध्ये शिथिलिता आणत आहे. त्याबरोबरच तेल कंपनीही कर्ज देणाऱ्या बॅंकांना पैसे देईल. त्यातून उत्पादन खर्च तुमच्याकडे येईल आणि फायद्यातून कर्जाचे हप्ते वळते केले जातील, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com