Karad NCP News : राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलने मिटकरींना पाठवली निरमा पावडर आणि दूध...

Rohit Pawar रोहित पवार यांच्यावर आमदार मिटकरी हे सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे रोहित पवार गट आक्रमक झाला आहे.
Rohit Pawar, Amol Mitkari
Rohit Pawar, Amol Mitkarisarkarnama

-हेमंत पवार

Karad NCP OBC Cell News : राष्ट्रवादीचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांच्यावर आमदार अमोल मिटकरी सातत्याने टीका करत आहेत. यावरून राष्ट्रवादीतील रोहित पवार गट सध्या आक्रमक झाला असून, कराडातील राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या वतीने मिटकरी यांना निरमा पावडर व दूध कुरिअरने पाठविण्यात आले. मिटकरी यांची पवारांवर बोलण्याची पात्रता नाही. त्यामुळे त्यांनी निरमा पावडर आणि दुधाने स्वतःचे चारित्र्य स्वच्छ करून घ्यावे, अशी टीका ओबीसी सेलचे प्रदेश सचिव समीर कुडची यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यावर आमदार मिटकरी Amol Mitkari हे सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे रोहित पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्यांचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव कुडची यांनी घेतला.

सचिव कुडची म्हणाले, ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी मिटकरी यांना आमदारकी बहाल केली आहे. त्याच खासदार पवारांच्या नातवावर ते टीका करत आहेत. आमदार अमोल मिटकरी हे आमदार रोहित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मिटकरी यांची पवारांवर बोलण्याची पात्रता नाही.

मिटकरी यांनी निरमा पावडर आणि दुधाने स्वतःचे चारीत्र्य स्वच्छ करून घ्यावे. त्यासाठी मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी निरमा पावडर आणि दुध कुरिअरने पाठवत आहोत. चारित्र्य स्वच्छ करून घ्यावे आणि मगच आमदार रोहित पवार यांच्यावर बोलावे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com