Satara : जागतिक शांततेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज... राजमोहन गांधी

जागतिक शांतता world peace आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक परिषदेचे World Conference उद्‌घाटन आज येथील रि-अर्मामेंट सेंटर येथे राजमोहन गांधी Rajmohan Gandhi यांच्या हस्ते झाले.
World peace  Conference
World peace Conferencesarkarnama
Published on
Updated on

पाचगणी : जागतिक स्तरावर समस्या आणि संधी समान पातळीवर उपलब्ध आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी आणि संधींचा लाभ घेण्यासाठी जागतिक स्तरावर बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी व्यक्त केली.

गेली ७५ वर्षे जागतिक शांतता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वास या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक परिषदेचे उद्‌घाटन आज येथील रि-अर्मामेंट सेंटर येथे श्री. गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सर्वास इंटरनॅशनल आणि इनिशिएटिव्ह ऑफ चेंज यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमर साबळे, सर्वास इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट जॉनी सेग्यँगर, व्हाईस प्रेसिडेंट कार्ला क्रिस्टनस्टेनसन, अभय शहा, सर्वास इंडियाचे अध्यक्ष डॉ. अविनाश शिरोडे, सर्वास इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभय शहा आदी उपस्थित होते.

राजमोहन गांधी म्हणाले,‘‘दुसऱ्यांच्या चुका दाखविण्याऐवजी आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहून बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय प्रयत्न करीत आहोत, हे पाहिले पाहिजे. अनेकदा आपण इतरांविषयी जाणून घेण्याआधीच त्यांच्याविषयीचे मत तयार करीत असतो. तसे न करता लोकांमध्ये मिसळून त्यांना समजून घेण्याची प्रक्रिया घडली पाहिजे.

World peace  Conference
Bharat Jodo : फुले पगडी घालून राहूल गांधी म्हणाले, सिर पर सम्मान है महाराष्ट्र का....

जागतिक स्तरावर बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झालेले नसून वयाच्या ८७ व्या वर्षीही माझ्यात काम करण्याची ऊर्मी असून, अजून अनेक ध्येय आणि उद्दिष्टे पूर्ण करणे बाकी आहेत.’’ अभय शहा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. या परिषदेमध्ये जगभरातील ४३ देशांमधील १३९ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन वर्षांतून एकदा होणाऱ्या या ३२ व्या परिषदेची संधी ४२ वर्षांनंतर प्रथमच भारताला मिळाली आहे.

World peace  Conference
Rahul Gandhi Get Emotional : महाराष्ट्र सोडताना राहुल गांधी भावूक

परिषदेत जागतिक शांतता, पर्यावरण, महिला सबलीकरण यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होणार असून पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवडदेखील केली जाणार आहे. या परिषदेत स्वीडनचे जॉनी, पोर्तुगालच्या कार्ला, ऑस्ट्रेलियाचे पॉल, अमेरिकेच्या पेज आणि राधा राधाकृष्णन, तसेच मलेशियाच्या कियात हे ‘सर्वास’चे जागतिक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

World peace  Conference
Satara : पुणे जिल्ह्यातून येऊन सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात... शाहजीबापूंचा राष्ट्रवादीला टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com