नवी शिर्डी उभारणार : काकडी परिसराचे भाग्य उजळणार

शिर्डी ( Shirdi ) जवळ असलेल्या काकडी ( Kakadi ) गावात विमानतळ ( Airport ) सुरू झाले आहे.
saibaba
saibabaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिर्डी देवस्थान जवळ असलेल्या काकडी गावात विमानतळ सुरू झाले आहे. या विमानतळ परिसराच्या विकासाची मागणी होत होती. या दृष्टीने आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76 वी बैठक होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काकडी परिसराचे भाग्य उजळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर - सिंह, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

saibaba
शिर्डी देवस्थान पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडे : आमदार आशुतोष काळेंकडे अध्यक्षपद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल, रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल.

saibaba
शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकले पाच कोटी, स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

परिसरातील आर्थिक विकासाबाबत ते म्हणाले, उपयोगिता लक्षात घेवूनच विमानतळाचा विकास व्हावा केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येवू नये तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल ,पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे शिर्डी विमानतळ परिसर पुण्यातील विमाननगर सारखे होईल अशी आशा स्थानिक नागरिकांत पल्लवित झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com