Praniti Shinde : येत्या दोन महिन्यांत सरकारच्या सर्व योजना बंद होणार; प्रणिती शिंदेंचा दावा

Mahavikas Aghadi Solapur Morcha : विविध योजनांचे अनुदान मिळणार नाही. कारण, सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले जात आहेत. कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही. कारण, सरकार दिवाळखोर झाले आहे. कारण, सगळे पैसे खर्च झाले आहेत.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, October : येत्या दोन महिन्यांत सरकारच्या सर्व योजना बंद होतील. केवळ तीन योजना चालू राहणार आहेत. आतापर्यंत निवडणुकीत टेबलाच्या खालून पैसे देत होते. आता वरून पाच हजार रुपये देत आहेत, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारच्या धोरणावर केली.

महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी सोलापूर शहरात संग्राम मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना खासदार शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावरून सरकारवर निशाणा साधला.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) काल म्हणाले, विविध योजनांचे अनुदान मिळणार नाही. कारण, सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले जात आहेत. कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही. कारण, सरकार दिवाळखोर झाले आहे. कारण, सगळे पैसे खर्च झाले आहेत. तुम्ही आता लाडक्या बहिणींना विकत घेणार का, असा सवाल करताना आम्हाला दीड हजार नव्हे तर सुरक्षा हवी आहे, अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली.

शिंदे म्हणाल्या, हे राक्षस सरकार आहे. हे मला सांगायचे आहे. (खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) बोलत असताना लाईट जाते). भाषण करताना सरकार लाईट घालवत आहे. गुजरातमधील कांद्याची निर्यात होते. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात केली नाही. सिंचन योजनांची पाणीपट्टी दहा टक्क्याने वाढवली आहे, त्याचा मी निषेध करते.

Praniti Shinde
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा राजन पाटलांवर गंभीर आरोप; ‘अप्पर तहसील कार्यालय दम देऊन अनगरला नेलंय’

बदलापूर घटनेतील भाजपचे दोन पदाधिकारी फरारी आहेत. मात्र, अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर घडविला आहे, असे सांगून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, आम्हाला (सोलापूर) विमानतळ नकोय, विमान सेवा हवी आहे. मी विमानतळावर बोलायला लागले की, तुमचे अक्कलकोटचे आमदार लगेच बोलायला येतील म्हणत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना टोला लगावला. सोलापुरात पन्नास वर्षांपासून विमानतळ आहे. मात्र, आम्हाला विमानसेवा हवी आहे.

Praniti Shinde
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ; ‘मुख्यमंत्री ओबीसींचे आरक्षण संपवत आहोत’

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळ उद्‌घाटनाला महायुतीचे 11 पैकी एकच आमदार उपस्थित होते. एक आमदार म्हणाला आम्हाला आमंत्रण मिळालं नाही, तर दुसरा म्हणाला मी दर्शनाला गेलोय. मोदी म्हणाले होते की यंत्रमाग कामगारांना आम्ही युनिफॉर्म शिवण्यासाठी देऊ. मात्र, मोदीजी हे यंत्रमाग कामगार केवळ टॉवेल आणि नॅपकिन तयार करतात, युनिफॉर्म नाही, ही फक्त शोबाजी आहे, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com