मुख्यमंत्र्यांना साफसफाई करायची की हाथसफाई? : नीलम गोऱ्हेंचा शिंदेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे करायचं आहे, ते त्यांनी करून दाखवावं.
Nilam Gorhe- Eknath Shinde
Nilam Gorhe- Eknath ShindeSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जे करायचं आहे, ते त्यांनी करून दाखवावं. मात्र, कोरोना काळात गंगा नदीतून प्रेतं वाहताना दिसून आली. हरियाणामध्ये कोविड पेशंट्स बघून डॉक्टर्स पळून गेले होते. मुख्यमंत्र्यांची साफसफाईची व्याख्या ही आहे का? असा सवाल शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केला. (Nilam Gorhe criticized Chief Minister Eknath Shinde)

शिवसेनेच्या दार उघड बये, दार उघड या विशेष मोहिमेचे या वेळी उदघाटन करण्यात आले. येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (ता. ३०) त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी महिला शिवसेनेच्या पदाधिकारी अस्मिता गायकवाड, सविता मते, पल्लवी जावळे, स्वाती ढमाले, शर्मिला येवले आदी उपस्थित होते.

Nilam Gorhe- Eknath Shinde
रक्ताची नाती कधीही संपत नसतात; पण... : पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आणखी साफसफाई करायची बाकी आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. त्याला विधान परिषदेच्या उसभापती गोऱ्हे यांनी उत्तर दिले आहे.

Nilam Gorhe- Eknath Shinde
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना जे करायचं आहे त्यांनी ते करून दाखवावं. पण त्यांना नेमकं सफासफाई करायची आहे की हाथसफाई करायची आहे, याबद्दल स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणतं नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Nilam Gorhe- Eknath Shinde
मागील सरकारच्या काळात विरोधकांनी सातत्याने त्रास दिला : हर्षवर्धन पाटलांचा रोख कोणाकडे?

गोऱ्हे म्हणाल्या की, केंद्र सरकारने पीएफआयवर केलेली कारवाई म्हणजे कुठे तरी अतिरेक्यांचा बागुलबुवा दाखवून मतांचे ध्रुवीकरण करत राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. नवरात्रामुळे आम्ही राज्यव्यापी जनजागरण मोहिम सुरु केली आहे. राज्यातील एकूण ६१ मंदिरात आम्ही ज्योत घेऊन महिलांच्या हक्कासाठी जनजागरण करत आहोत. महिलांच्या अत्याचाराचे गुन्हे वेगाने निकाली निघावे यासाठी राज्याने मंजूर केलेले शक्ती विधेयक केंद्राकडे मंजूरीसाठी पडून आहे. ते लवकर अमंलात यावे. नॅशनल क्राईम रेकार्डसमध्ये महारष्ट्रात गुन्हे सिध्दीचे प्रमाण फक्त ५४ टक्के आहे. म्हणजे उर्वरीत ४६ गुन्हेगार समाजात जाऊन पून्हा गुन्हेगारी वाढवतात असा त्याचा अर्थ होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com