Jayant Patil News : 'योगी आदित्यनाथ गडावर आले आणि मुख्यमंत्री झाले, लंके तुम्हीही या !' पाटलांनी घेतली फिरकी

NCP News : जयंत पाटील यांनी आपल्या मार्मिक शैलीत लंकेंची फिरकी घेतली.
Jayant Patil, Nilesh Lanke News
Jayant Patil, Nilesh Lanke NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षात असलेले शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटात गेलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके रविवारी (1ऑक्टोबर) पुण्यात एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष, म्हणजे लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला आणि तोही जयंत पाटलांच्या हस्ते. मात्र, दोन गटांत असले तरी या दोघांनी आणि विशेष करून जयंत पाटलांनी लंकेची चांगलीच फिरकी घेतानाच त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुकही केले.

लाईक माईंडेड एनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट या संस्थेच्या वतीने राजकीय क्षेत्रातील लाईफ स्फूर्ती पुरस्कार नीलेश लंके यांना शनिवारी पुण्यातील नितू मांडके सभागृहात जयंत पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना जयंत पाटील यांनी आपल्या मार्मिक शैलीत लंकेची राजकीय फिरकी घेतली. गोरक्षनाथांचा आश्रम आमच्या शिराळयाला आहे. माझ्या मतदारसंघात किल्ले मच्छिंद्रगड असून तिथे फार सुंदर मंदिर आहे.

Jayant Patil, Nilesh Lanke News
Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' नावे चर्चेत...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याअगोदर या गडावर येऊन गेलेले आहेत. त्या मुळे लंके साहेब तुम्हालाही गडावर यायचे असेल तर तुम्ही या ! असे पाटील यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. कोरोना महामारीमध्ये लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात १ हजार १०० बेडची व्यवस्था करीत रुग्णांना आधार देऊन त्यांच्या मनातील भीती दुर करण्याचे महत्त्वाचे काम केल्याने हजारो कोरोना रुग्णांना जीवदान मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील (Jayant Patil) साहेब व मी शेजारी बसलो. पाऊस पाण्याच्या गप्पा मारत होतो तेव्हा लगेच छायाचित्रकार फोटो काढू लागले. राजकारण काहीही असो आम्ही बोलायचेही नाही का ? किती बंधने ? मी म्हणतो राजकारणी माणसाला प्रसिद्ध पाहिजे असते. मात्र, त्यास मर्यादा असायला हव्यात. जास्त प्रसिद्ध मिळाली की लगेच त्याच्या पाठीमागे कॅमेरामन पळू लागतात, असे लंके यांनी सांगितले.

माणसाने आपल्या जीवनात असे काही काम करावे की आपण गेल्यानंतर किमान २५ वर्षे त्याची आठवण राहिली पाहिजे. आज मी आमदार म्हणून येथे उभा आहे. जयंत पाटील नेते म्हणून बसलेले आहेत. मात्र, हे सर्व शून्य आहे. शेवटी तुम्ही माणसातला देव पाहा असे लंके यांनी सांगितले. कार्यक्रमास चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुदामराव गोरखे गुरुजी, आयोजक ओंकार कोंढाळकर, अ‍ॅड. भूषण राऊत, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढारे, प्रद्युम्य राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, निंबळकचे सरपंच अजय लामखडे या वेळी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Jayant Patil, Nilesh Lanke News
Nashik Politics : दिंडोरी मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली; १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com