टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांत होणार आहेत. त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत आपले विरोधक कोण असणार त्यांचा सामना कसा करायचा याची रणनीती आखली जात आहे. या संदर्भात आमदार नीलेश लंके यांनी महत्त्वाचे राजकीय वक्तव्य केले आहे. Nilesh Lanka says, we have the power to defeat them all ...
कर्जुले हर्या (ता.पारनेर) मांडओहळ धरणातील पाण्याचे जलपूजन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, संजीव भोर, अॅड. राहुल झावरे, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, रामदास दाते, शशिकांत आंधळे, चंद्रभान ठुबे, उद्योजक किशोर ठुबे, उपविभागीय अभियंता व्ही.टी.शिंदे उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, सलग तीन वर्षे मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकाचे नुकसान झाले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील. नुकसान भरपाई ही मिळेल राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
आमदार लंके पुढे म्हणाले, मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. मतदारसंघात आलेला विकासनिधी हा माझ्या माध्यमातून येतो. काहींचा परस्पर गपचूप उद्घाटन करण्याचा तो प्रकार सुरू आहे. तो चुकीचा आहे त्या कार्यक्रमांना शासकीय अधिकारी व ठेकेदार देखील उपस्थित नसतात. पाणी अडविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अनेक गावांना बंधाऱ्यांसह अन्य कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात व अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकी बाबत काय निर्णय होईल ते पाहू. मात्र पारनेर तालुक्यात मी विरूध्द सर्व असंतुष्ट असाच सामना होईल मात्र या सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात आहे, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.