Nilesh Lanke News : आळंदीत मारहाण झालेल्या भागा महाराजांना महापुजेचा मान मिळावा; नीलेश लंकेंची मागणी !

Nilesh Lanke on Palakhi News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना पूजा करण्याचा अधिकार नाही; लंकेंचा गरजले..
Nilesh Lanke News :
Nilesh Lanke News :Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : आळंदीत संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी आळंदीत काही वारकऱ्यांनी मंदिरात प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे केली. त्याच बरोबर दुपारी अडीच वाजे नंतर पूर्वापार मंदिराबाहेरून प्रवेशद्वाराहून असलेली दर्शनाची परवानगी यंदा नाकारली. यामुळे माऊलींचे दर्शन राहिलेल्या वारकऱ्यांची गर्दी वाढली. या दरम्यान पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये पारनेर तालुक्यातील नांदूरपठार येथील भागा महाराज घोलप हे गंभीर जखमी झाले आहे. (Latest Marathi News)

Nilesh Lanke News :
Wardha Lok Sabha Seat : काँग्रेसकडे असलेल्या वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही; उमेदवारीसाठीही सरसावले नेते!

डोक्यास मार लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, नगर येथील शासकिय रूग्णालयात त्यांच्या डोक्याचे बुधवारी स्कॅन करण्यात आले. दरम्यान, मारहाण झालेल्या भागा महाराज यांना महापुजेचा मान मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे.

आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळयासाठी नांदूरपठार येथील विणेकरी भागा महाराज घोलप हे नित्यनियमाप्रमाणे यंदाही आळंदी येथे गेले होते. रविवारी माउलींच्या पालखी प्रदशिणादरम्यान नित्यसेवक म्हणून सेवा देणारे विद्यार्थी निघाले असता पोलीसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलीस व वारक-यांमध्ये धुमश्‍चक्री उडाली.

या सर्वांकडे पास आणि दिंडी या दोन गोष्टी नसल्याने त्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. दरवर्षी प्रवेश देण्यात येतो, यंदा नकार का असे म्हणत वारकरी विद्यार्थी आक्रमक झाले. आणि ढकलाढकली सुरू झाली. पोलीसांना दूर सारून वारकरी विद्यार्थी महाद्वाराकडे जाण्यासाठी धावू लागले. पोलिसांना त्यांना रोखणे अशक्य झाल्याने लाठीचार्ज सुरू झाला, त्यातच हभप भागा महाराज घोलप हे सापडले. पळापळ आणि लाठीहल्यात ते जखमी झाले.

Nilesh Lanke News :
Sanjay Raut Threat Case : मोठी बातमी ; राऊत धमकी प्रकरण बनाव ? आरोपी मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय..

भागा महाराज घोलप हे गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना नांदूरपठार येथे आणण्यात आले. टाकळीढोकेश्‍वर येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने बुधवारी त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात हालविण्यात आले. तेथे त्यांच्या डोक्याचे स्कॅन करण्यात आले. आमदार नीलेश लंके यांनी शासकिय रूग्णालयात जाऊन घोलप महाराजांची विचापूस केली. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना दिल्या. बेदम मारहाण झाल्यामुळे घोलप महाराज यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहेत. मला मारू नका, मला मारू नका असे वारंवार म्हणत आहेत.

वारकरी सांप्रदाय व नांदूरपठार ग्रामस्थांनी घोलप महाराज यांना पोलीसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे लाठीचार्ज झाल्याचा आरोप नांदूरपठार ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 54 वर्षांपासून विणेकरी असलेले घोलप महाराज, हे नियमितपणे माऊलींच्या पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर या पायी वारीसाठी जातात. यंदा त्यांना लाठीचार्जमध्ये अमानुष मारहाण झाल्याने कोरोना काळाचा अपवाद वगळता त्यांची 54 वर्षांपासूनची परंपरा खंडीत झाली आहे.

Nilesh Lanke News :
Lok Sabha Elections News : या मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक ; दोनवेळा राज्यसभेवर..

पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये भागा महाराज यांच्या पाठीवर, हातावर लाठ्यांचे व्रण उमटले आहेत. आजही ते तसेच आहेत. डोक्यास मार लागल्याने त्यांची मानसिक स्थितीही बिघडली आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्वांना परिचित असणारे माझ्या मतदारसंघातील नांदूर पठार येथील वारकरी ह.भ.प भागा महाराज घोलप (विणेकरी) हे गेल्या ५४ वर्षा पासून अखंड पणे आळंदी ते पंढरपूर अशी माऊलीच्या पालखी सोहळ्या बरोबर पायी वारी करत आहेत, असे लंके आहे.

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ही घटना ऐकण्यासाठी सुद्धा अत्यंत क्लेशदायक वाटते. लाठी चार्ज करायला समोर कोणी चोर, दरोडेखोर अतिरेकी होते का ? कोणी शातीर गुंड होते, ज्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लगबगीने लाठीचार्ज करावा लागला, असा संतप्त सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे. पंढरपुरात दरवर्षी वारीच्या निमित्ताने वीस ते पंचवीस लाख लोक एकत्र जमलेले असतात. परंतु तिथे अशी कुठली घटना घडल्याचे ऐकिवात नाही. पुणे पोलीस प्रशासनाने त्यांना हे कृत्य का करावे लागले, याचे किमान महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण द्यावे, असे म्हणत त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com