Nilesh Lanke : कार्यकर्ता हीच माझी ताकद...

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी आज (सोमवारी) चांदबीबी महाल परिसरातील महिलांना मोहटादेवी दर्शनाला नेते प्रसंगी ते बोलत होते.
MLA  Nilesh Lanke
MLA Nilesh LankeDatta Ingale
Published on
Updated on

Nilesh Lanke : शारदीय नवरात्रोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघातील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवणे, त्यांना परत सुखरूप घरापर्यंत पोचवणे, ही राजकारणी नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून मी जबाबदारी पार पाडत आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी आज (सोमवारी) चांदबीबी महाल परिसरातील महिलांना मोहटादेवी दर्शनाला नेते प्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख होते. या नियोजनासाठी सरपंच प्रियंका लामखडे, अजय लामखडे, अनुराधा कांडेकर, शिवा हेळकर, संजय जपकर, वसंत पवार, घनश्‍याम म्हस्के, नितीन कोतकर, हरिदास जाधव, बाबा काळे,सुनीता धनवटे आदी होते.

MLA  Nilesh Lanke
Nilesh Lanke : धनगर समाजाला नीलेश लंकेंनी दिला शब्द : आरक्षणासाठी विधीमंडळात उठविणार आवाज

लंके म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून आठव्या माळेपर्यंत १ लाख २६ हजार महिला भाविकांना मोहटादेवी दर्शन घडवण्याची ताकद मतदार संघातील माता भगिनींच्या आशीर्वादाने मिळाली आहे. मी सर्व मातांचा मुलगा म्हणून त्यांना देवदर्शन घडवीत आहे. पारनेर व नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्याने केलेल्या नियोजनामुळे मोहटादेवी दर्शन यात्रा यशस्वी झाली आहे.

महेबूब शेख म्हणाले, आजच्या राज्यातील सरकार आज राजकारण म्हणून उपयोग करतात. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सामाजिक कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पर पाडत आहे. आमदार नीलेश लंके हे आधुनिक युगातले श्रावणबाळ असून ते प्रत्येक माता-भगिनींची आपल्या माता-पित्या प्रमाणे सेवा करत आहे.

MLA  Nilesh Lanke
नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

तीनशे बसची व्यवस्था

पहिल्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत महिलांना दर्शनासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे तीनशे बसची व्यवस्था केली. यामध्ये महिलांच्या फराळाची व्यवस्था केलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com