कर्जतमधील घटनेने नितेश राणे आक्रमक : म्हणाले, तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे प्रतीक पवार या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला.
Hindu-muslim Politics| Nitesh Rane|
Hindu-muslim Politics| Nitesh Rane|

BJP News : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे प्रतीक पवार या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला प्रतीक पवारने नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळेच झाला असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane )गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन प्रतीक पवारच्या तब्बेतीची चौकशी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे,' असा इशारा दिला.

नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे म्हणाले की, आता अहमदनगर जिल्ह्यात अल्पसंख्यांक मंत्री पालकमंत्री म्हणून नाहीत. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे दबावात काम करू नका. नगर जिल्ह्यात नुपूर शर्मांच्या नावाखाली एका युवकावर हल्ला झाला. या युवकाबरोबर हल्लेखोरांनी सोशल मीडियावर चर्चा झाली होता. त्याचे पुरावेही आहेत. तरीही हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात आहे. हे चुकीचे आहे. पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नुपूर शर्मा प्रकरणातून झालेला असल्याचे सांगितले असताना पोलीस प्रकरण दडपत असल्याचा आरोप राणे यांनी केला. गोपीचंद पडळकर यांनी कर्जतमधील पोलीस निरीक्षक हे कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला.

Hindu-muslim Politics| Nitesh Rane|
नुपूर शर्मा व न्यायालय - काय म्हणतात कायदेतज्ज्ञ ?

पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, प्रतीक पवारवर झालेला हल्ला हा त्याने नुपूर शर्मांच्या संदर्भात टाकलेल्या पोस्टमुळे झालेला आहे. त्याला लक्ष्य करण्यात आले. पोलिसांना याचा योग्य तपास करावा लागेल. पोलिसांकडून खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे. तसे न करता पोलीस प्रतीक पवारच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे भासवित आहे. पोलिसांनी दबावात काम करू नये. कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले.

Hindu-muslim Politics| Nitesh Rane|
नुपूर शर्मा- नवीन जिंदल यांच्या विरोधात देशभर निदर्शनांचा वणवा : मुस्लिम समाज आक्रमक

ते पुढे म्हणाले की, मी प्रतीकला भेटलो. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला डॉक्टरांनी 24 तास निगरानी खाली ठेवायला सांगितले आहे. त्याला अन्य कारणामुळे मारहान झाली असे पोलिसांचे म्हणणे खोटे आहे. तू हिंदू-हिंदू करतोस, नुपूर शर्माचा डिपी ठेवतोस, म्हणून हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांबरोबरील प्रतीकचे चॅट पोलिसांनी पहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आता हिंदुत्त्वाला माननारे सरकार आहे. हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल तर आम्ही शांत बसणारे नाहीत. त्यामुळे कोणी घाबरू नये. असे प्रकार घडल्यास हिंदुत्त्वादी संघटना व पोलिसांकडे तक्रार करावी. कोणी मस्ती करायचा प्रयत्न करू नये. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्वादी सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या प्रकरणावर त्यांचे लक्ष आहे. जास्त मस्ती कराल तर सर्व प्रकारचे औषध या सरकार जवळ आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com