ड्रग्ज प्रकरण भरकटवणाऱ्या राजकीय नेत्यांचा दंगलीत हात

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) अडकला आहे. तसेच, अन्य काहीजणांची चौकशी सुरू आहे.
Nitin Chowgule
Nitin ChowguleSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सध्या महाराष्ट्रात ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अनेकजण अडकत चालले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने चालला असताना देखील तपास भरकटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांचा हात राज्यातील काही भागात नुकत्याच झालेल्या दंगलीमागे (Riots) आहे का, असा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले (Nitin Chowgule) यांनी शनिवारी (ता.13 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केला.

Nitin Chowgule
औरंगजेबी प्रवृत्तीला वेळीच ठेचा

दरम्यान, त्रिपुरात न घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात मोर्चाचे आयोजन करणाऱ्या रझा अकादमीवर तत्काळ बंदी घालून झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

चौगुले म्हणाले, "त्रिपुरात ही तथाकथित घटना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस घडलेली आहे. एक प्रर्थनास्थळ पाडण्यात आल्याची अफवा पसरविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जे मोर्चा काढले जातात त्याचे नेतृत्व रझा अकादमीकडून केले जाते. त्यांनी काढलेल्या मोर्चात जाळपोळ तसेच, दुकानांची मोडतोड झाली आहे. यापूर्वी देखील मुंबई येथे अकादमीने मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांवरही हल्ले झाले. तेव्हाच संघटनेवर बंदी घातली पाहिजे होती."

Nitin Chowgule
रियाझ भाटीच्या पत्नीचे क्रिकेटपट्टू हार्दीक पांड्यावर गंभीर आरोप

"ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान हा अडकला आहे. तसेच, अन्य देखील काहीजणांकडे चौकशी सुरू आहे. यामुळेच जाणीवपूर्वक या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी दंगल घडविण्यात आली का? याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. दंगल हे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामागील सूत्रधार कोण आहे? याचा तपास गृहविभागाने तातडीने करावा. नजीकच्या काही दिवसांत रझा अकादमीवर कारवाई न झाल्यास हिंदुचा संताप अनावर होईल, याची दखल सरकारने घ्यावी."

कंगनाच्या वक्तव्याचा निषेध!

"हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासंदर्भात अभिनेत्री कंगनाने केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळे कंगनाने या सर्वांचा अपमान केला आहे." असे चौगुले म्हणाले, यावेळी आनंद चव्हाण, प्रकाश निकम, प्रशांत गायकवाड, हरिदास पडळकर कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com