औरंगजेबी प्रवृत्तीला वेळीच ठेचा

रझा अकादमीवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे करावी अशी मागणी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.
Atul Bhatkhalkar
Atul BhatkhalkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : त्रिपुरात (Tripura Violence) न घडलेल्या घटनांच्या अफवा पसरवून महाराष्ट्रात दंगली (Riots) घडविण्याचे काम रझा (Raza Academy) अकादमीच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे (Central Government) करावी, अशी मागणी भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

Atul Bhatkhalkar
रियाझ भाटीच्या पत्नीचे क्रिकेटपट्टू हार्दीक पांड्यावर गंभीर आरोप

सन 2012 च्या दंगलीनंतर शिवसेनेनेच (Shivsena) रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली होती, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. काल (ता.12 नोव्हेंबर) अफवा पसरवून व त्यातून मुस्लीम तरुणांची माथी भडकवून महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे काम रझा अकादमीने केले आहे. यावेळी पोलिसांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाप्रकारची देश व समाजविरोधी कृत्य करणाऱ्या व धर्मांध प्रवृतींना खतपाणी घालणाऱ्या रझा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे करावी अशी मागणीही भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Atul Bhatkhalkar
वसीम रिझवीच्या पुस्तकामुळे दंगल भडकली..

महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असताना दरवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगल घडविण्याचे काम रझा अकादमी कडून सातत्याने करण्यात येत आहे. ऑगस्ट 2012 मध्ये सुद्धा याच रझा अकादमीने मुंबईत मोर्चा दरम्यान संपूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती. इतकेच नव्हे तर महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार केला होता. मागील वर्षी कोरोनाच्या काळात फ्रान्स मधील कथित मुस्लीम विरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागात आंदोलन करत दंगल भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा औरंगजेबी प्रवृत्तीना वेळीच ठेचणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रझा अकादमीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com