Satara News : राष्ट्रवादीमधील कुणीही फुटणार नाही; शशिकांत शिंदेंचा विश्वास

Shashikant Shinde आमदार शिंदेंनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की राष्ट्रवादीतील कोणीही फुटणार नाही.
NCP MLC Shashikant Shinde
NCP MLC Shashikant Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Shashikant Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील NCP कुणीही कुठे जाणार नाही, असे खुद्द शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे या केवळ वावड्या असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी व्यक्त केले आहे. मात्र, शिंदे गटाचे १६ आमदार शंभर टक्के अपात्र होतील आणि सरकार बरखास्त होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

आमदार शिंदेंनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की राष्ट्रवादीतील कोणीही फुटणार नाही. शिंदे गटाचे १६ आमदार शंभर टक्के अपात्र होणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होणार आहे. आता सरकार अस्थिर होणार असल्याने अशा वावडय़ा उठत असतात हे येणार ते येणार.

लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्यात दम असेल तर लगेच निवडणूका जाहीर करा. पण, ते करु शकत नाहीत. करण त्यांना विश्वास नाही. त्यांच्या दिल्लीतील यंत्रणेलाही माहिती मिळालेली आहे. त्यांचे दहा ते बाराच्यावर खासदार निवडून येणार नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करायची तर सहा महिने आधी करावी लागते.

लोकसभेची मुदत संपण्यास अजून एक वर्ष तर विधानसभेला दीड वर्षे कालावधी आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. आसरानीच्या उपमेवर आमदार शिंदे म्हणाले, एखाद्याला स्वतःची भिती वाटायला लागते. तेव्हा तो कलाकारांची नावे घेतो. त्यांच्या दृष्टीने मी आसरानी असलो तरी ते गब्बरसिंग आहेत. गब्बरसिंग गाव लुटायला यायचा हा तर जिल्हाच लुटायचा प्रयत्न करतोय. मस्ती आणि हुकूमशाही फार काळ चालत नाही.

NCP MLC Shashikant Shinde
Satara News : उदयनराजे संतापले...म्हणाले, उपनिबंधकांचा पेन जड झालाय; असे निष्क्रिय अधिकारी पदावर बसलेत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Sharad Pawar
Pune Legislative Council election Teachers Graduates Constituency
mahayuti and mva
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com