Pandharpur News : 'काय झाडी, काय डोंगार...' या 'डायलॉग'ने प्रसिद्धीझोतात आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी त्यांच्या कामाची पद्धत आपल्या खास शैलीतून सांगितली आहे. आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी फायदा झाल्याचेही ते म्हणाले.
शेवटी राजकारणात कुणीही कुणाचे नसते. राजकारण करताना सर्वांशी चांगले संबंध ठेवून आपली करून घ्यावी लागतात. राजकारण करताना कुठेही असलो तरी तेथे शरद पवारांच्या फांद्या आहेतच. तसेच प्रेम असल्यानेच मी शिवसेनेत गेलो, असे रोखठोक वक्तव्य सांगोल्याचे आमदार पाटील यांनी केले आहे.
पंढरपूर येथील एका सभेत आमदार शहाजी पाटील (Sahaji Patil) बोलत होते. त्यावेळी त्यांनी जनतेपेक्षा कुणी मोठा नाही. जनता हीच आपली संपत्ती असल्याचे सांगितले. जनतेसाठी आपण कसे बड्या नेत्यांशी जुळवून घेत कमे करून घेतली, याची त्यांनी माहिती दिली.
पाटील म्हणाले, "जीवनात जनतेसाठी मी चालाखपणा केला. पवारसाहेबांकडे गेल्यावर त्यांना वाटायचे शहाजी माझा आहे. शिंदेसाहेबांकडे गेलो की शहाजी माझा आहे. विलासरावांकडे गेल्यावर ते म्हणायचे या जावईबापू! पतंगराव म्हणायचे की बाप्या तुला एकदा आमदार केल्याशिवाय राहत नाही. असे सर्वांशी गोडगोड बोलून आपली कामे करून घ्यायची. येथे कुण कुणाचे नसते. आपल्या कामांशी मतलब ठेवायचा. जनता आपली असते. खरे गबाळ लोक आहेत."
पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कामाचीही स्तुती केली. सर्व पक्षात त्यांनी घडविलेले लोक असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. पाटील म्हणाले, "आज मी शिवसेनेत आहे. इतर अनेक जण वेगवेगळ्या पक्षात आहेत. पण मागेमागे गेलो तर ही सर्व शरद पवारांच्या झाडाच्या फांद्याच असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हा पंढरपूर हा शरद पवारांवर प्रेम करणारा तालुका आहे."
पाटील यांनी यावेळी एकीकडे राज्याच्या विकासासाठी शिंदेचे नेतृत्व गरजेचे असल्याचे सांगितले तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबार प्रेम असल्याचेही म्हणाले. पाटील म्हणाले की "राज्याच्या गतिमान विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारख्या खंबीर माणसाकडे सूत्रे असायला हवीत. आता मी शिवेसनेत आहे. ठाकरे घराण्यावर प्रेम नसते तर मी शिवसेनेत गेलोच नसतो. यापूर्वी मला काँग्रेसमध्ये काहीच कमी नव्हते."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.