Mumbai News: एकाही सरकारकडून माथाडींचे हित जपले गेले नाही : नरेंद्र पाटील यांची खंत

Narendra Patil: अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईतील माथाडी भवनात झालेल्या सभेत श्री. पाटील बोलत होते.
Death anniversary of Annasaheb Patil
Death anniversary of Annasaheb Patilsarkarnama
Published on
Updated on

-राजेश पाटील

Mumbai News : सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे. मलाही त्याची खंत वाटतेय, कुठेतरी कमी पडतोय असेही वाटते. आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांचे हित कुठेही जपल गेलेले नाही, म्हणूनच (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोकप्रतिनिधीला बोलावण्याची इच्छाच झाली नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी आज केले.

अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईतील माथाडी भवनात झालेल्या सभेत श्री. पाटील बोलत होते. नरेंद्र पाटील म्हणाले,‘‘ सध्या माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माथाडी बोर्ड उदध्वस्त होत आहे. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जात आहे, पण शासनाला त्याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगारमंत्री हे उदयोगपतीच होते आणि आताचेही आहेत. मग, कामगारांना न्याय कसा मिळणार?.

आजही सभागृहात कामगारांसंदर्भात कोणताही कायदा मंजूर करताना अण्णासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्याचे उदाहरण दिले जाते, हेच खरे अण्णासाहेबांच्या अभेद्य चळवळीचे यश आहे. म्हणूनच आपण सर्वांनी संघटित होऊन माथाडी कामगार चळवळीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांशी सामना करायला पाहिजे. शिवाय संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याचीही गरज आहे.’’

Death anniversary of Annasaheb Patil
Narendra Patil News : दंड थोपटत नरेंद्र पाटलांनी आपल्याच सरकारला नमवलं!

युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,‘‘ माथाडी कामगार चळवळ अत्यंत बिकट रस्त्याने वाटचाल करीत आहे. अण्णासाहेबांच्या ऐतिहासीक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर अभेद्य एकजूट कायम राहिली पाहिजे. अण्णासाहेबांची लढाई सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी होती. त्याकाळी अण्णासाहेबांनी पेटविलेल्या वातीचा आज ज्वालामुखी झाला आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com