Mahabaleshwar News : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांनी जमीन खरेदी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुरू आहे. आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे. यामध्ये चंद्रकांत वळवींसह त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्वांना येत्या २० जूनला सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
झाडाणी (Satara Mahabaleshwar) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी लढा दिला होता. त्यांच्या लढ्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस काढली होती.
याप्रकरणी ११ जून रोजी सुनावणीसाठी झाली. पण त्यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील तारिख २० जून ही मिळाली आहे. आता या प्रकरणात आणखी पुढे जाऊ लागले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिका-यांनी आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणेतंर्गत नोटीसा काढल्या आहेत.
यामध्ये पूर्वीचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्याबरोबरच त्यांचे नातेवाईक श्रीमती रत्नप्रभा अनिल वसावे, दिपेश अनिल वसावे, श्रीमती संगीता चंद्रकांत वळवी, श्रीमती अरुणा बोंडाळ, गौतम मोहन खांबदकोन, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी, दिपाली दिलीप मुक्कावार यांचा समावेश आहे.
येत्या 20 जून रोजी आवश्यक ती कागदपत्रे आणि लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी उपस्थित राहून कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही असे गृहित धरून जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटीशीत देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.