Pusesavali News : पुसेसावळी दंगलीत एकाचा मृत्यू,११ गंभीर; २०० जणांवर गुन्हा दाखल

Social Media Post सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जाळपोळीची घटना काल रात्री घडली होती.
Police deployment in Pusesawali
Police deployment in PusesawaliSachin Shinde, Karad
Published on
Updated on

Satara Pusesavali News : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. जखमींवर कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी औंध पोलिसांत तब्बल २०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वातावरण तणावपूर्ण असल्याने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ४८ तास बंद राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट पडली होती. त्याची पोलिसांत police तक्रार देण्यात आली होती. त्याची चौकशी पोलिस करत असतानाच अचानक काल रात्री पुसेसावळीत Pusesavali दंगल उसळली. पुसेसावळी येथील दत्त चौकात मोठ्या प्रमाणात युवक जमू लागले. जमलेला युवकाचा घोळका संतप्त होता. जमावाने जवळपास अर्धा तास 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.

रात्री साडेनऊच्या सुमारास जमाव गावात शिरला. तेथून त्यांनी थेट मारूती मंदीरापासून जवळच असलेल्या प्रार्थनास्थळाकडे जमावाने कुच केली. काही कळायच्या आत प्रार्थनास्थळावर हल्ला केला. दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. जमावाच्या हातात दांडके, दगड, लोखंडी गजासारखी शस्रे होती. जमावाने ११ ते १२ जणांना मारहाण केली. तेथून काहींनी पळ काढला.

मात्र त्यावेळी झालेल्या मारहाणीत नुरसहन शिकलगारसहीत ११ जण गंभीर जखमी झाले. त्यात शिकलगार याच्या डोक्यात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बाहेर लावलेल्या सहा दुचाकी जमावाने जाळल्या. त्यानंतर जमावाने गावातील दुकाने, वाहने फोडली. ठराविक घरांवर दगडफेक केली. त्यातही लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुख्य बाजारपेठेतील तब्बल दहा दुकानावर दगडफेक झाली. घटना घडत असताना जवळपास तासाभराने पोलिस घटनास्थळी पोचले. मात्र, तोपर्यंत जमाव पांगला होता. रात्री उशीरा जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपाधीक्षक शेडगे यांच्यासह औंध व पुसेसावळीचे पोलिस तेथे पोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी वाढीव पोलिस बंदोबस्तही मागविला.

गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पहाटे शिकलगारचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी पुन्हा वातावरण तणावपूर्ण झाले. त्यानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. दिवसभर नेट सेवा बंद होती. आगामी ४८ तास इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Police deployment in Pusesawali
Satara Pusesavali News: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल होणार

दिवसभर गावात तणावपूर्ण वातावरण होते. सांयकाळी चारच्या सुमारास शिकलगारचा मृतदेह पुसेसावळीत आणण्यात आला. त्यावेळीही मोठा पोलिस बंदोबस्त होता. जखमी सरफराज बागवान यांच्या फिर्यादीवरून औंध पोलिसात तब्बल २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police deployment in Pusesawali
Mumbai Dabewala Union Demand : फडणवीससाहेब, जबाबदारी ओळखा अन्‌ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्या; मुंबईत डबेवाल्यांची संघटना आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com