Crime News
Crime News Sarkarnama

Crime News : निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट; मुंबई पोलीस दलातील एकाला अटक

Pandharpur News : सांगोला तालुक्यातील वासूद येथील एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.

Sangola News : सांगोला तालुक्यातील वासूद येथील एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणी मुंईतील एका पोलिसाच्या (Mumbai Police) विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलातच मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निलंबित सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास केला. यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद ता. सांगोला) या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.

Crime News
Raj Thackeray On Narendra Modi : राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले; आणीबाणीनंतर आज पुन्हा पत्रकारितेवर बंधने

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे तीन ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजणेच्या सुमारास वॉकिंग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांना मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता. दरम्यान 4 ऑगस्ट रोजी सकाळी चंदनशिवे यांचा सांगोला-वासूद रस्त्याच्या लगत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना समोर आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पंधरा दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांच्या हाती खूनाचे धागेदोरे लागले आहेत. संशयित आरोपी सुनील‌ केदार यांना सांगोला पोलिसांनी आठ दिवसापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते.

Crime News
Latur Politics : विलासराव देशमुखांच्या विश्वासू माजी मंत्र्यासमोर काँग्रेस की' बीआरएस'चा पेच ?

तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुनील‌ केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली. पोलिसाच्या गुनामध्ये पोलीस दलातील व्यक्तीचाच सहभाग असल्यामुळे या प्रकरणाची राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com