साई भक्तांची ऑनलाईन फसवणूक : साई संस्थांकडून गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे साई संस्थान जगभर प्रसिद्ध आहे. दररोज हजारोभाविक साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतात.
shirdi
shirdi Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे साई संस्थान जगभर प्रसिद्ध आहे. दररोज हजारोभाविक साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतात. सध्या ऑनलाईन व्यवहाराचा तसेच ऑनलाइन पध्दतीने हॉटेल रुम बुकींग आणि इतर सुविधा घेण्याच प्रमाण वाढत आहे. यात फसवणुकीचा प्रकार ही वाढतोय. आता हे लोण थेट साईभक्तांपर्यंत येवुन पोहचलय.

शिर्डीला येणारे भाविक विश्वासाने साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातील रुम बुक करणे पसंत करतात. साई संस्थानकडुनही भक्तांना ऑनलाइन बुकींग करुनच शिर्डीत येण्याच आवाहनही केल जात. मात्र साईभक्तांच्या आस्थेला आणि खिशाला खात्री लावण्याच काम ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याकडुन आता केलं जात आहे.

shirdi
Dr. Sujay Vikhe Patil : नगर-शिर्डी महामार्गासाठी सुजय विखेंचे गडकरींना साकडे

साई संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्या नंतर एक मोबाईल नंबर दिला गेला आहे. साई संस्थान मार्फत चालविल्या जाणाऱ्या द्वारावती भक्त निवासाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींगसाठी 7602853094 या नंबर वर फोन केल्या नंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार्ड द्वारे पेमेंट करा अस समोरुन सांगीतलं जातं. इतर फसवणुकीच्या व्यवहारात जशी ओटीपीची पध्दत वापरली जाते ती येथेही फसवणुक करणारे वापत आहेत.

साई संस्थानचा कर्मचारीच आपल्याला मार्गदर्शन करतोय अस समजून देशभरातून येणारे काही भाविक या फसवणुकीला बळी पडत असल्याच उघड झालय.

shirdi
बंगळुरूचे 178 साईभक्त अडकले शिर्डी विमानतळावर

या भक्ताची फसवणूक

मुंबईतील जय शर्मा यांनी असच बुकींग केल. मात्र ते शिर्डीला आले असता त्यांनी द्वारावती भक्त निवासाच्या बुकींग काऊंटर वर जावून चौकशी केल्या नंतर तस काही बुकींगच झाल नसल्याच समोर आलय. ज्या मोबाईल नंबर वर संभाषण करत रुम बुक केली गेली होती. त्यावर पुन्हा फोन केला असता अश्लील शिवीगाळ केली जात असल्याचं भविकाकडून सांगण्यात आले आहे.

साई संस्थानच्या नावाने फेक वेबसाईट

मागील एक महिन्याभरापासून साई संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून मुंबई. दिल्ली. अश्या अनेक राज्यातील भाविकांची रूम बुकिंगच्या नावा खाली लुट सुरू असल्याची बाब. साईबाबा संस्थानच्या आयटी विभागाच्या लक्षात आल्यानंतर आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या फेक वेबसाईटवर जावून त्याचे व्युव्ह चेक केलं आणि त्यावर थेट एसएमएस केली आहेत. द्वारावती भक्तनिवास या नावाची गुगलवरील ही वेबसाईट फेक असुन साई संस्थांनची. online.sai.org.in ही वेबसाईट आहे. त्याच बरोबर ( 02423 ) 258775. 258960. 258500 हा फोन क्रमांक अधिकृत असून साई संस्थानच्या कुठलाही सुविधे विषय माहिती पाहिजे असेल तर वरील वेबसाईट आणि क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हानही साई संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

shirdi
देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन पोचली शिर्डीत

भाविकांची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई

मुंबई आणि दिल्ली येथील काही भाविकांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार संस्थानकडे केल्यानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांनी तातडीने ॲक्शन घेत द्वारावती भक्त निवासच्या नावाने फेक वेब साइट बनून भाविकांना लुटणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपल्या आयटी विभागाला दिले आहे. त्याच बरोबर कोणी व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली. अन्नदानाच्या नावाखाली जर भाविकांना लुटत असेल तर त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही बनायात यांनी सांगितले.

शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल

याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानचे आयटी विभागाचे प्रमुख अनिल केशवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा र नंबर 388/22 भादवी कलम 419, 420 माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com