भाजपचा उन्माद पवारच थांबवणार; आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार... मिटकरी

हा शिंदे गट Eknath Shinde भाजपात BJP विलीन व्हावा हीच देवेंद्र फडणवीसांची Devendra Fadanvis इच्छा आहे. पण, लवकरच हे सरकार पडेल, असे भाकित श्री.मिटकरी Amol Mitkari यांनी केले.
Devendra Fadanvis, Amol Mitkari
Devendra Fadanvis, Amol Mitkarisarkarnama

गोंदवले : सत्तेचा आणि पैशाचा उन्माद असणाऱ्या चुकीच्या लोकांना निवडून देऊन पुन्हा चूक करू नका. भारतीय जनता पार्टीचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यातच आहे. राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असल्याने भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात आमदार मिटकरी बोलत होते.यावेळी खा.श्रीनिवास पाटील,या.बाळासाहेब पाटील,आ.दीपक चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माणचे नेते प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, महिला आघाडीच्या कविता म्हेत्रे, सारंग पाटील, अभय जगताप, सुनील पोळ, सुभाष नरळे आदी उपस्थित होते.

Devendra Fadanvis, Amol Mitkari
भाजप आणि ५० खोकेवाल्यांचे हिंदुत्वप्रेम बेगडी... अमोल मिटकरी

आमदार मिटकरी म्हणाले, जनसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नावर उपाययोजना आखणारे प्रभाकर देशमुख हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेले. तर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांना न्याय मिळेल. विकासाच्या संकल्पना साकारण्यासाठी मदत होईल. सत्तेचा, पैशाचा उन्माद असणारी चुकीचे लोक पुन्हा निवडून देऊ नका.

Devendra Fadanvis, Amol Mitkari
NCP : गुन्हेगारांच्या टोळ्यासारखे पक्ष चालविणाऱ्यांकडून लोकहिताची भाषा... रामराजे

भाजपाचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त पवार साहेबांमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला बळकट करा.बाळासाहेब देवरस या आरएसएसच्या देवाचे नाव शिंदे गटाला मिळालंय. हा शिंदे गट भाजपात विलीन व्हावा हीच देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे. पण, लवकरच हे सरकार पडेल. डिसेंबरमध्ये गुजरातच्या बरोबर कदाचित महाराष्ट्रातही निवडणूका लागतील. आपण या निवडणुकीसाठी तयारी करावी.

Devendra Fadanvis, Amol Mitkari
अजित पवार ट्रेनिंगसाठी लिहीणार देवेंद्र फडणवीसांना पत्र...

श्रीनिवास पाटील म्हणाले, माणच्या विरुद्ध निसर्ग होता. पण हा निसर्ग आपल्या बाजूने करण्यासाठी ज्याच्या हातात शासनाने सत्ता दिली होती. त्या राष्ट्रवादीला आणखी संधी मिळाली पाहिजे, म्हणूनच राष्ट्रवादी जनसंपर्क अभियान राबवून लोकांना जोडण्याचे काम करा. पुन्हा एकत्र या, हातात हात घालून सगळे पुढे जाऊया या. यश थोड्याच दिवसावर आहे. आपले मनगट घट्ट असेल तर कुणीही काही करू शकणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com