-विशाल गुंजवटे
Maan Political News : राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आघाडी आहे. माढा, सातारा मतदारसंघात आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करू. मात्र, माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा होता, अन् यापुढेही तो शिवसेनेचाच राहिल. या मतदरसंघात उमेदवारही शिवसेनेचा असेल. 2024 चा आमदार पण शिवसेनेचा असेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी व्यक्त केला आहे.
शेखर गोरे Shekhar Gore म्हणाले, राज्यात स्वार्थी राजकारणापोटी लोकशाही संपत चालली आहे. शिवसेना फोडणाऱ्यांच्या हाताशी काहीच लागले नसून उलट राज्यभर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी Udhav Thackeray सहानभुतीची लाट निर्माण झाली आहे. माण मतदारसंघात आम्ही कायमच आघाडीबरोबरच राहण्याची भूमिका बजावली आहे. मात्र ते कधीही बरोबर आले नाहीत.
राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आघाडी आहे. माढा, सातारा मतदारसंघात आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराच प्रामाणिकपणे काम करू. मात्र, माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा होता, अन् यापुढेही तो शिवसेनेचाच राहिल. या मतदरसंघात उमेदवारही शिवसेनेचा असेल.
2024 चा आमदार पण शिवसेनेचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माणचे लोकप्रतिनीधी जलनायक म्हणून मिरवून घेत मतदारसंघात पाणी आणले म्हणून सतत दिडोंरा पिटत आहेत. तरीही मतदारसंघात टँकर का चालू आहेत. तुमचेच कार्यकर्ते पाण्यासाठी उपोषणे करतात. यावरून तरी आपले कर्तृत्व ओळखून जा.
निवडणूकीनंतर सहा महिन्यात जिहे-कटापूरचे पाणी नाही आणले तर राजीनामा देऊन पुन्हा विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरणार नाही, म्हटले होते. जनतेला हेच शब्द देऊन निवडणूका जिंकल्यात. मग माणच्या मातीशी इमानेइतबार राखत जनतेला दिलेला शब्द पाळणार का, हे ही त्यांनी स्पष्ट करावे.
Edited By : Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.