आमच्या मातोश्रीचा विश्वासघाताने पराभव केला, भविष्यात त्याची परतफेड नक्कीच करू : ढोबळे

बिनविरोध होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज ठेवून विश्वासघात कोणी केला, याची चर्चा कोमल ढोबळे यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने सुरू झाली.
Komale Dhoble
Komale DhobleSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या २०१७ मधील निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गटातून आमच्या मातोश्री अनुराधा ढोबळे (माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी) यांचा पराभव झाला. बिनविरोधच्या नावाखाली त्या वेळी आमची अगदी शेवटपर्यंत दिशाभूल करून विश्वासघात केला. भविष्यात त्या विश्वासघाताची परतफेड नक्कीच करू. पण, त्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सहकार्य करावे, असे म्हणत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांनी आमदार आवताडेंच्या पुढे मैत्रीचा हात केला आहे. (Our mother was defeated by betrayal : Komale Dhoble)

हुलजंती गटातून अनुराधा ढोबळे यांचा तब्बल पाच हजारांहून अधिक मतांनी गेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्या पराभवाची सल ढोबळे कुटुंबीय अजूनही विसरलेले दिसत नाही. पण, त्या निवडणुकीत नक्की विश्वासघात कोणी केला, अशी चर्चा मंगळवेढा तालुक्यात पुन्हा रंगली आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे विजयी आमदार समाधान आवताडे यांचा पुणे येथील रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने रविवारी (ता. ऑक्टोबर) सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा तथा माजी मंत्री ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Komale Dhoble
किरीट सोमय्या बारामतीत कोणावर निशाणा साधणार

त्या कार्यक्रमात बोलताना कोमल ढोबळे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की मंगळवेढा तालुक्यातील मातब्बर राज्यकर्त्यांचा विरोध पत्करून एक उमलतं नेतृत्व तयार होत आहे; म्हणून दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत समाधान आवताडे यांच्या पॅनेलला आम्ही मदत केली. त्या मदतीच्या माध्यमातून त्यांचे पॅनेल कारखान्यावर सत्ताधारी बनले. अडचणीतही त्यांनी कारखाना चांगला चालवून दाखवला. पण, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत हुलजंती गटातून आमच्या मातोश्री (स्व.) अनुराधा ढोबळे यांना संधी देण्यात आली होती. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे सूतोवाचदेखील त्यावेळी करण्यात आले होते. त्याबाबतच्या तडजोडीदेखील झाल्या होत्या. अर्ज माघारी घेण्याचा अंतिम वेळेपर्यंत दिशाभूल करून विश्वासघात झाला.

Komale Dhoble
राष्ट्रवादीतील वाद पेटला; जिल्हाध्यक्ष साठे, उमेश पाटलांची शरद पवारांकडे तक्रार

शीला शिवशरण यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीत राहिला. जवळपास पाच हजारांच्या मताधिक्याने आमच्या मातोश्रींचा पराभव झाला. भविष्यात ही घटना सुधारण्याची संधी नक्की येईल. त्या वेळी झालेल्या विश्वासघाताची परतफेड नक्कीच करू, असा इशारा देत कोमल ढोबळे यांनी त्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ढोबळे यांनी केले.

बिनविरोध होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज ठेवून विश्वासघात कोणी केला, याची चर्चा कोमल ढोबळे यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने सुरू झाली. भविष्यात या पराभवाचा वचपा ढोबळे कुटुंबीयाकडून कसा काढला जाणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे. शेवटी त्यांनी हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे बोलून दाखवले असले तरी मनामध्ये मात्र पराभवाची सल असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com