Pandharpur News: पंढरपूर नगरपालिकेच्या सभेत गदारोळ; भाजप नगरसेवकांचा सभात्याग, आघाडीनंही राजकीय वातावरण तापवलं

Pandharpur Politics: पंढरपूर नगरपालिकेच्या बुधवारी (ता.9) झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. स्थायी समितीची बैठक का बोलावली जात नाही आणि नगरपालिकेची जागा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देऊ नये, या मुद्द्यांवरून भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.
Pandharpur Politics  .jpg
Pandharpur Politics .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News: पंढरपूर नगरपालिकेच्या बुधवारी (ता.9) झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. स्थायी समितीची बैठक का बोलावली जात नाही आणि नगरपालिकेची जागा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देऊ नये, या मुद्द्यांवरून भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.

पंढरपूर नगरपालिकेचे भाजप नगरसेवक ओंकार जोशी, भागवत बडवे, राहुल शिंदे-नाईक, संजय बंदपट्टे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आणि लक्ष्मण पापरकर यांच्यामध्ये स्थायी समितीची बैठक का बोलावली जात नाही आणि नगरपालिकेची जागा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देऊ नये या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाली.

संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. भाजपच्या नगरसेवकांनी सभा सोडताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांच्या या कृतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत निषेधाच्या घोषणा दिल्या, त्यामुळे सभागृहातील वातावरण आणखीच तापले.

यावेळी नगरसेवक सुनील वाळूजकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला जागा देण्याच्या विषयावर केवळ वाद न घालता, पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी केली.

Pandharpur Politics  .jpg
Buldhana DCC Bank: 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक, राजेंद्र शिंगणेंनी विरोधकांचा डाव उधळत बाजी पलटवली

त्यावर पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले आणि सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. पंढरपूर नगरपालिकेतील हा गदारोळ संपूर्ण दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.

पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून शहरात राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. स्थानिक नागरिक, तीर्थक्षेत्र बचाव समिती तसेच काही स्थानिक नगरसेवकांनी (भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांसह) कॉरिडॉर प्रकल्पाला आणि विकास आराखड्याला (DP) तीव्र विरोध दर्शवला आहे.

Pandharpur Politics  .jpg
Eknath Shinde British Parliament Awards : शिंदेंच्या ब्रिटिश संसदेतील पुरस्कारांवर सरोदेंचा खोचक टोला; म्हणाले, ‘पैसे असतील तर...’

पंढरपूर नगरपालिकेच्या डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाला झुगारून मतदारांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांना 11,136 मताधिक्यांनी निवडून दिले होते. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेवर अपवाद वगळता गेल्या चाळीस वर्षांपासून एकहाती असलेली परिचारक (भाजप) च्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश आले होते.

भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, प्रणव परिचारक यांनी निवडणूक हातात घेतली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून या निवडणुकीत लक्ष घातले होते. पालकंमत्री गोरे यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या निवडणूकीत लक्ष घातले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com