पंकजा मुंडे, पाचपुतेंसह राष्ट्रवादीच्या दोन तर कॅाग्रेसच्या एका नेत्याला नोटीस...

Pankaja Munde:Dhananjay Munde : महसूल वसुली प्रमाणपत्र आरसीसी कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
Pankaja Munde News in Marathi, Beed News
Pankaja Munde News in Marathi, Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : सत्तर टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी (FRP) देणाऱ्या राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून नोटीस बजावली आली आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, (Pankaja Munde) अहमदनगरचे भाजप (BJP) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute), यांचा समावेश असून या सहा साखर कारखान्यांपैकी दोन कारखाने हे राष्ट्रवादीच्या (NCP) तर तीन कारखाने हे भाजप नेत्यांचे असून एक कारखाना काँग्रेस नेत्याचा आहे. (Pankaja Munde News, Dhananjay Munde News)

Pankaja Munde News in Marathi, Beed News
पंकजांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सुषमा अंधारे झाल्या उद्धव ठाकरेंसमोर भावूक!

यंदा राज्यातील उसाचा गळीत हंगाम हा १५ जूनला संपला असून यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. भारताने यंदा साखर व ऊस उत्पादनात जागतिक पातळीवर ब्राझीलसारख्या ऊस उत्पादक देशाला मागे टाकले आहे. यामध्ये राज्याचा वाटा मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी मिळण्यासाठी विशेष पाठपुरावा केल्याने आतापर्यंत ९७ टक्के एफआरपीचे वाटप झालेले आहे. तर उर्वरित ठिकाणी साखर कारखाने व शेतकऱ्यांत एफआरपीचे पैसे दिवाळीपर्यंत देण्याबाबचे करार झालेत.

Pankaja Munde News in Marathi, Beed News
`..तेव्हा उद्धव ठाकरेंनी चार माणसे ठेवून खाजवून घ्यायला पहिजे होते...'

दरम्यान, याबाबत जे कारखाने एफआरफी देत नाहीत अश्या कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (RRC)कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. यामुळेच राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या सहा साखर कारखान्यांना नोटीस बजावल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सहा साखर कारखान्यांना आरसीसीनुसार नोटीस बजावल्या असून यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांचा समावेश असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरसीसी रक्कम थकवली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडलेले दिसत आहेत.

नोटीस बजावलेले कारखाने

  • साेलापूर - सहकार शिराेमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - आरसीसी रक्कम ३६७४.९० लाख (कल्याणराव काळे, राष्ट्रवादी)

  • सातारा - किसनवीर ससाका भुईंज, सातारा-आरसीसी रक्कम - ४११.९१ लाख (आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी )

  • बीड - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी-आरसीसी रक्कम - ४६१५.७५ लाख (माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)

  • उस्मानाबाद - जयलक्ष्मी शुगर प्राे. नितळी - आरसीसी रक्कम - ३४०.६९ लाख (विजयकुमार दंडनाईक, भाजप)

  • नगर - साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर - आरसीसी रक्कम -२०५४.५० लाख - (आमदार बबनराव पाचपुते, भाजप)

  • पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लि. भाेर- आरसीसी रक्कम २५९१.६९ लाख (आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com