Pankaja Munde Shivshakti Rally : पंकजा मुंडे यांचे शंभू महादेवाच्या चरणी साकडे; म्हणाल्या, मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दे....

Shikhar Shingnapur शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाच्या दर्शनासाठी पंकजा मुंडेआल्या होत्या, त्यांनी मंदिरात रुद्राभिषेक केला.
Udayanraje Bhosale, Pankaja Munde
Udayanraje Bhosale, Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

-धनाजी कावडे

Pankaja Munde Shivshakti Rally : स्वर्गीय मुंडे साहेबांची अपुरी इच्छा पुर्ण करण्यास शंभू महादेव मला शक्ती दे, असे साकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शंभू महादेवाच्या चरणी घातले. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने पंकजा मुंडे यांनी आज शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवास रुद्राभिषेक केला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या BJP नेत्या व माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे Pankaja Munde यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने शिखर शिंगणापूर Maan येथे आज सकाळी त्यांचे आगमन झाले. ग्रामपंचायत व पळशी ग्रामस्थांच्या वतीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

त्यानंतर मंदिरात आल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर पंकजाताई व खासदार उदयनराजे यांनी शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात जाऊन रुद्राभिषेक केला.

यावेळी सातारच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सभापती अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udayanraje Bhosale, Pankaja Munde
Pankaja Munde Jejuri : शिव-शक्ती परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी पंकजा मुंडेंनी घेतले जेजुरीच्या खंडोबारायाचे दर्शन...

पंकजा मुंडे यांनी आपले वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यास शंभू महादेव मला शक्ती दे, असे साकडे शंभू महादेवाच्या चरणी घातले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com