Pankaja Munde : ‘बटेंगे तो कटेंगे’च्या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रया; ‘माझं चांगलं चालल्याचा काहींना...’

'Batenge to Katenge' controversy : मी भाजपचे नाव घेऊन असं कधीही म्हटलेलं नाही, माझ्याकडे ते रेकॉर्डिंग ही आहे. बटेंगे तो कटेंगे या विषयाशी मला कोणतीही कॉमेंट करण्याची इच्छा नाही, कारण माझे मत मी सभेत मांडत आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 November : ‘बटेंगे तो कटेंगे’ च्या विधानावरून सुरू असलेल्या वादंगावर भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अक्कलकोटमध्ये भाष्य केले आहे. भाजपच्या मताशी सहमत नाही, असं मी कुठेही म्हटलेले नाही. मात्र, माझं चांगलं चाललंय. माझा प्रचार सुरूय आणि फिरते आहे, त्यामुळे काही लोकांना थोडासा त्रास होणारच ना?, अशी तक्रार पंकजा यांनी केली आहे.

भाजपचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या प्रचारासाठी भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे अक्कलकोट मतदारसंघात आल्या होत्या. त्या वेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’च्या वादावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, मी इलेक्ट्रॉनिक मीडियला कोठेही आणि कसंही बोलले असेल तर रेकॉर्डिंग असतं. मात्र, प्रिंट मीडियला आपण जेव्हा बोलतो, तेंव्हा त्याचे हे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत.

मला त्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या पक्षातले तुमचे कोणते नेते, असं म्हणाले तर तुमचं त्यावर मत काय? त्यावर मी दिलेलं उत्तर आहे. त्यांच्या मतांशी सहमत असण्याचं माझं काही कारण नाही. मी कुठेही असं म्हटलेलं नाही आणि आयुष्यात म्हणणार नाही कारण मी एक सिरीयस लीडर आहे. मात्र काही लोकांना सवय आहे. माझा चांगलं चाललंय. चांगला प्रचार सुरूय आणि फिरते तर काहींना थोडासा त्रास तर होणारच ना, असा सवालही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला.

Pankaja Munde
Karmala Politics : संजयमामा शिंदेंवर भाजपच्या वरिष्ठांची कृपादृष्टी की स्थानिक नेत्यांचे प्रेम?

पंकजा म्हणाल्या, मी भाजपचे नाव घेऊन असं कधीही म्हटलेलं नाही, माझ्याकडे ते रेकॉर्डिंग ही आहे. बटेंगे तो कटेंगे या विषयाशी मला कोणतीही कॉमेंट करण्याची इच्छा नाही, कारण माझे मत मी सभेत मांडत आहे. माझा प्रचार हा मोदींचा विकास आणि महायुती सरकारचा विकास यावर केंद्रित आहे.

मी आत्तापर्यंत जीवनामध्ये दहा हजार भाषण केली असतील, ती तुम्ही ऐका. मात्र भाजपच्या मताशी मी सहमत नाही, असं मी कधीही बोललेले नाही. मी तस म्हणायचं काही कारणही नाही आणि मी ते म्हटलेलं नाही, माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवरून त्या म्हणाल्या की, आता मी काय त्याच्यावर टॉक शो करू शकत नाही.

Pankaja Munde
Ranjit Sinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची?

राज्यभरात महायुतीसाठी खूप छान वातावरण आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीही सभा खूप छान झाली, त्यामुळे खूप मोठ्या मताधिक्यांनी सचिन कल्याणशेट्टी निवडून येतील. राज्यामध्ये माझ्या 22 ते 23 सभा झाल्या आहेत. खूप चांगल्या सभा होत आहेत; करण लोक बोलकी आहेत. त्यामुळे लोकसभेला जे काही फेक नरेटिव्ह होतं ते आता दिसत नाहीए.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com