Karmala Politics : संजयमामा शिंदेंवर भाजपच्या वरिष्ठांची कृपादृष्टी की स्थानिक नेत्यांचे प्रेम?

Assembly Election 2024 : करमाळा तालुक्याचे राजकारण कायम छुप्या आघाड्यावर चालू असते. आपण मला पाठिंबा दिला आहे. आपलं लव्ह मॅरेज आहे, आपलं ॲरेंज मॅनेज नाही. ॲरेंज मॅरेज म्हटल्यावर बैठकीत काही ना काही बोलावं लागतं.
Sanjay Shinde
Sanjay ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 November : करमाळ्यातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस, करमाळा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदेंना आपला पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदेंनी आपलं ‘लव्ह मॅरेज आहे, ॲरेंज मॅरेज’ नाही, असे सांगून हा पाठिंबा माझ्यावरील प्रेमापोटी असल्याचे म्हटले आहे. मात्र, पाठिंबा दिलेले भाजपचे पदाधिकारी हे वरिष्ठांच्या आदेशानुसारच आम्ही संजय शिंदेंना पाठिंबा दिल्याचे खासगीत सांगत आहेत, त्यामुळे संजयमामांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रेम आहे की भाजपच्या वरिष्ठांची कृपादृष्टी, अशी चर्चा रंगली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात (Karmala Assembly Constituency) महायुतीमधील शिवसेनेकडून दिग्विजय बागल, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील आणि विद्यमान आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

करमाळ्यात भाजपचे (BJP) जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, करमाळ्याची जागा शिवसेनेला गेली असून शिवसेनेने दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर चिवटे यांनीही माघार घेतली आहे. मात्र, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भाजपकडून जिल्हा सरटचिणीस चिवटे यांच्यासह करमाळा तालुकाध्यक्ष रामभाऊ डहाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sanjay Shinde
Ranjit Sinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची?

भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा तालुकाध्यक्ष रामभाऊ डहाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदेंनी आपलं ‘लव्ह मॅरेज आहे, ऑरेंज मॅरेज’ नाही, असे सांगून हा पाठिंबा माझ्यावरील प्रेमापोटी असल्याचे म्हटले आहे.

करमाळा तालुक्याचे राजकारण कायम छुप्या आघाड्यावर चालू असते. आपण मला पाठिंबा दिला आहे. आपलं लव्ह मॅरेज आहे, आपलं ॲरेंज मॅनेज नाही. ॲरेंज मॅरेज म्हटल्यावर बैठकीत काही ना काही बोलावं लागतं. देवाण घेवाण करावी लागते. आपण प्रेमाने आणि तालुक्याच्या विकासासाठी माझ्यासोबत आला आहात, त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, असे संजय शिंदे यांनी सांगून हा स्थानिक नेत्यांचा निर्णय असल्याचे नमूद केले आहे.

Sanjay Shinde
Balasaheb Thorat : 'सांगली पॅटर्न'वर थोरातांनी 'शिवसेनाUBT' पक्षाची का मागितली जाहीर माफी; मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान...

दुसरीकडे, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, असे भाजपतून हकालपट्टी केलेले भाजपचे पदाधिकारी खासगीत सांगत आहेत, त्यामुळे संजय शिंदेंवर भाजप नेत्याची कृपादृष्टी आहे की स्थानिक भाजप नेत्याचे प्रेम असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com