Parbhani Lok Sabha News : जानकरांच्या विजयासाठी माढ्यातून रसद; रासपचे पदाधिकारी परभणीत दाखल...

Lok Sabha Election 2024 : आपल्या नेत्याला कुठूनही निवडून आणायचंच...
Parbhani Lok Sabha News
Parbhani Lok Sabha NewsSarkarnama

Satara News : माणचे भूमिपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर हे महायुतीमधून परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांची जन्मभूमी माण तालुक्यातील असली तरी त्यांची कर्मभूमी मराठवाडा आहे. त्यामुळेच त्यांनी हक्काचा माढा लोकसभा मतदारसंघ सोडून परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. जानकरांना माढ्यातून निवडून आणण्याची संधी न मिळाल्याने परभणीत जाऊन त्यांना निवडून आणण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची टीम परभणीला प्रचारासाठी रवाना झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

धनगर समाजाचे नेतृत्व करत राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून संस्थापक महादेव जानकर यांनी मोठ्या प्रमाणात धनगर समाज एकत्र करण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबामधील व जमिनीवरचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. माण तालुक्यातील पळसावडे ही त्यांची जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी म्हणून मराठवाड्याला ओळखले जाते. तिथे त्यांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. महायुतीत घटक पक्ष असल्याने त्यांना आमदारकीही मिळाली आहे. राज्यभरात त्यांनी रासपची मजबूत संघटना निर्माण केली असून, दिल्लीत पक्षासाठी भवन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parbhani Lok Sabha News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

महायुतीत आपल्या समाजाला न्याय मिळत नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुती विरोधात जाऊन महाविकास आघाडीशी बैठका चालू केल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीकडूनही वेळकाढूपणा होत असल्याने ते नाराज होते. त्यात रासपची ताकद आपल्या विरोधात गेली तर राज्यात त्रासदायक ठरेल, यामुळे महायुतीने रासपशी जुळवून घेतले. त्यावेळी त्यांनी माढा किंवा परभणीतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. माढ्यात अगोदरच भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्यासाठी महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघ सोडला गेला.

माढ्यात सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघ येत असून, या दोन जिल्ह्यातही धनगर समाज मोठा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद चांगली आहे. मात्र, आपले नेते परभणीतून लढणार असल्याने सर्वांचा हिरमोड झाला होता. मात्र आपल्या नेत्याला कोठूनही निवडून आणायचेच हा चंग बांधून स्वखर्चाने त्यांच्या प्रचारासाठी सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची टीम परभणीला गेली आहे.

Parbhani Lok Sabha News
Satara Loksabha Constituancy : 'वंचित' बिघडविणार साताऱ्यात कोणाचे गणित..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्यासाठी ऐतिहासिक सभा घेतली असून, महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेतेमंडळी महादेव जानकर यांच्यासाठी प्रचारात अग्रेसर आहेत. आपल्या जन्मभूमीतील ही रासपची टीम आपल्या प्रचारासाठी आल्याने त्यांच्या प्रचार यंत्रणेला बळकटी मिळाली आहे. येत्या २६ तारखेला तेथे मतदान होणार आहे.

Parbhani Lok Sabha News
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...
Parbhani Lok Sabha News
Solapur NCP : उत्तम जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही; जिल्हाध्यक्षांनी सुनावले

एक दिवस पंतप्रधान होऊनच दाखवीन...!

महादेव जानकर (Mahadev Jankar) माण तालुक्यातील जनतेला नेहमी म्हणत असत, तुम्ही सर्वजण माझे जिवाभावाची असला तरी तुमच्यापेक्षा मला मराठवाड्यात चांगली साथ मिळाली आहे. माणसाने नेहमी मोठी स्वप्नं पाहावीत. तसेच मी एक दिवस पंतप्रधान होऊनच दाखवीन. असे ते कायम म्हणत असतात. एवढं मोठे स्वप्न उराशी बाळगून त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. ते निवडून आले तर त्यांच्या स्वप्नाची पहिली पायरी ते चढणार आहेत. संसदेत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान पदाची वाटचाल महाकठीण असली तरी त्यांच्या ध्येयापासून तो टप्पा फारसा दूर नसेल. मात्र, त्यांना त्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अगोदर परभणीची लढाई जिंकावी लागणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com