Arunadevi Pisal : एकीकडे लाडक्या बहिणींच्या नावाचा डांगोरा पिटायचा, तर दुसरीकडे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या खंडाळा तालुक्यामधील सावित्रीच्या एका लेकीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली, की विधानसभेत मौन बाळगायचे, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आमदारांकडे लाडक्या बहिणीवर बोलण्याची नैतिकता आहे का? असा सवाल युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केला.
वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघामधील महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ खंडाळा तालुक्याच्या शिरवळ जिल्हा परिषद गटातील विविध गावांना दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उमेदवार अरुणादेवी पिसाळ, माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, शिरवळचे शहराध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष संपत कांबळे, सुशांत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, ‘‘या विधानसभा मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीत अनेक गंभीर प्रश्न असून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या मतदारसंघामध्ये महिला शक्तीचा सन्मान करीत महाविकास आघाडीने माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देत प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण केली आहे.
त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाकरिता अहोरात्र झटणार आहे. याप्रसंगी कवठे, जवळे, कर्नवडी, कान्हवडी, शिरवळ यासह गटातील विविध गावांमध्ये भेट देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
गद्दारांना जागा दाखवा
तीन वेळची आमदारकी, एकाकडे राज्यसभेची खासदारकी, जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद व दुसऱ्याकडे संचालक पद, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकपद, एकाकडे कारखान्याचे अध्यक्षपद अन् दोन्ही भाऊ संचालक, खरेदी विक्री संघ, सूतगिरणीवरही दोन्ही भाऊ संचालक, रयत शिक्षण संस्थेवर स्वतः लाभनायक, जनता शिक्षण संस्थेवर मोठे बंधू, गावातील स्कूल कमिटीवर पण हेच अशी एकूण १९ ते २० ठळक माहिती असणारी पदं एका घरात आहेत.
गावात एखादं गणपती मंडळ असेल, तर तिथंही याच घरातला अध्यक्ष असणार, हे निश्चित..! संस्था कोणतीही असो हे बंधू मलिदा ओरपायला सगळ्यात पुढे असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..! ज्यांनी या घराला राजकीय ताकद आणि ओळख दिली त्या शरद पवार यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत त्यांनी उघड गद्दारी केल्याने त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन विराज शिंदे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.