Prabhakar Gharge: म्‍हसवडचा पाणीप्रश्‍‍न प्रलंबित का?

Prabhakar Gharge: महाविकास आघाडीचे उमेदवार म्‍हणून मतदारांशी संवाद
Man Assembly
Man AssemblySarkarnama
Published on
Updated on

Prabhakar Gharge : गेल्‍या पंधरा वर्षांपासून माण- खटावच्‍या लोकप्रतिनिधींनी स्वतःला जलनायक अशी पदवी बहाल करून घेतली असली, तरी स्वयंघोषित जलनायकाला आजवर म्हसवड शहराचा पाणीप्रश्न सोडवता का आला नाही? असा घणाघाती टोला महाविकास आघाडीचे माण- खटाव विधानसभा मतदारसंघातील राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

निवडणूक प्रचारार्थ म्हसवड परिसरातील विविध भागात मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, तुषार वीरकर, माजी उपनगराध्यक्ष महादेव मासाळ, जयसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, कुमार सरतापे, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, शांताराम माने, बाळासाहेब माने, श्रीराम पाटील, शांताराम माने, बाळासाहेब सावंत, अनिल लोखंडे, बाबासाहेब माने, विकास सरतापे, जोत्स्ना सरतापे, राजेंद्र जगताप, चंद्रकांत केवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Man Assembly
Prabhakar Gharge: आघाडीच देणार २१ गावांना पाणी..!

श्री. घार्गे पुढे म्हणाले, ‘‘माणसह म्हसवड येथील तरुणांच्‍या हातात काम नसल्‍याने ते व्यसनाधीनतेकडे झुकू लागले आहेत, त्‍याला जबाबदार कोण आहे? आमदार गोरे येथील नागरिकांना पिण्याचे पाणी देखील पुरेसे उपलब्ध करू शकले नाहीत. असे असताना सर्वत्र मी केले, असे सांगत सुटले आहेत.

म्हसवड शहराचा विकास केला, असे म्हणणाऱ्यांना खरेतर म्हसवडकरांनी जाब विचारला पाहिजे. शहरात फक्त रुटिंगची विकासकामे सुरू आहेत. ती कामे कोणीही करू शकते. माण तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या या शहरात एखाद्याचा अपघाती मृत्‍यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्‍या मृतदेहास दहिवडी येथे न्यावे लागत आहे, हे म्हसवडकरांचे खरेतर दुर्दैव आहे.’’

म्हसवडसारख्या शहरात आज एकही औद्योगिक प्रकल्प उभा राहू शकला नाही. जातीजातीत भांडणे लावून सामान्य तरुणांची डोकी भडकावणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, अशी वर्तणूक करणे हेच आजवर येथे घडल्याने येथील अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सत्तेसाठी हे काहीही करतील. जिकडे सत्ता तिकडे मी असे समीकरण असणाऱ्या लोकप्रतिनिधीला यंदा घरी बसवण्यासाठी आता महाविकास आघाडी सज्ज झाली आहे, असेही श्री. घार्गे यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी प्रभाकर देशमुख, किशोर सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त करताना आमदार गोरे यांच्यावर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com